Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, February 24, 2023

गुरववाडी येथे शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते गाव अंतर्गत बंदिस्त गटार कामाचे भूमिपूजन संपन्न.

सारा न्यूज नेटवर्क _
अक्कलकोट (प्रतिनिधी) : अक्कलकोट तालुक्यातील गुरववाडी ग्रामपंचायत कार्यालयात दि.२२/२/२०२३ रोजी गुरववाडीच्या सरपंच सौ.लक्ष्मी म्हाळप्पा पुजारी यांच्या अध्यक्षेतखाली मासिक सभा घेण्यात आली.
दरम्यान गाव अंतर्गत बंदिस्त गटार कामाचे भूमिपूजन ढंगापूर ता.आळंद जि.गुलबर्गा येथील श्री गुरु शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच गुरववाडी ग्रामपंचायत कार्यालयात नवीन फर्निचर इतर साहित्यचे पूजनही यावेळी महास्वामीजी यांनी केले व म्हाळप्पा पुजारी यांच्या पुढील कार्यास शुभआशीर्वाद दिले.
यावेळी याप्रसंगी गुरववाडीचे विकासरत्न तथा माजी सरपंच म्हाळप्पा पुजारी,सरपंच सौ.लक्ष्मी म्हाळप्पा पुजारी,बसवराज देवरमनी,मल्लिकार्जुन इंगळगी,अंबाबाई कोळी,सारिका वंकारी,काशिनाथ मुतगी,अर्जुन बाहदुरे. रंगनाथ विंचुरे,शिवपुत्र आलूरे, सिद्धा सावळी,खोब्बांना जेजुरी, काशिनाथ मणूरे,शिवानंद मुंडेवाडी,घाळेप्पा सावळी,इराण्णा फुलारी आदींसह गुरववाडी ग्रामपंचायत कर्मचारी शिवानंद रावजी,गुरुशांत सावळी समवेत गुरववाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment