Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, February 23, 2023

भावूक वातावरण युनिक इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये दहावीच्या निरोप समारंभ........

सारा न्यूज नेटवर्क :
सोलापूर :डी.एस.टी. एस. मंडळ संचलित, युनिक इंग्लिश मिडीयम च्या इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ साजरा दि २२ फेब्रुवारी २०२३ युनिक इंग्लिश मिडीयम च्या इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 
यावेळी सामाजीक कार्येकर्त्या सौ. माधुरी शुक्ला या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमात दहावीच्या सर्व शिक्षकांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. विद्यार्थ्यांनी शालेय आठवणींना उजाळा देत. विद्यार्थ्यांनी भाषणे केली. व सर्व शिक्षकवृंदाला आठवण रूपी भेटवस्तू देण्यात आल्या, अत्यंत भावूक होऊन शाळेला निरोप दिला.
संस्थेचे अध्यक्ष, मा.श्री. राजशेखर शिवदारे सरांनी विद्यार्थ्यांना परीक्षा साठी शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेच्या शैक्षणिक सल्लागार सौ. अंजली तिवारी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबर भावी आयुष्याच्या वाटचाली साठी मार्गदर्शन केले, तसेच सदस्या डॉ.सौ. शुभदा उपासे मॅडम, उपस्थित पाहूणे सौ श्रुती गायकवाड मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पूजा बाजपेयी मॅडम यांनी परीक्षे बददल सूचना व मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्मिता पाटील यांनी व आभार सौ मानसी झलकीकर यांनी मानले तसेच शाळेतील सर्व शिक्षकव शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या, कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता शाळेतील सर्व शिक्षकव शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment