Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, February 12, 2023

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपतींकडून मंजूर, नवे राज्यपाल रमेश बैस, देशात 13 राज्यपाल व उपराज्यपाल बदलले

 


१२ फेब्रुवारी 2023 

सोलापूर(प्रतिनिधी): महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजीनामा मंजूर केला आहे. याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आवाज उठवला होता. राज्यपालांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती.

रमेश बैस महाराष्ट्राचे २० वे राज्यपाल म्हणुन शपथ घेतील.

सामान्य कार्यकर्ता ते सात वेळा खासदार, एकही निवडणुक पराभूत नाही, झारखंड व त्रिपुरा राज्याचे माजी राज्यपाल आदरणीय श्री. रमेश बैस जी हे महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त महामहिम राज्यपाल नियुक्त झाले आहेत.

No comments:

Post a Comment