Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, February 27, 2023

भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक सुनील कामाठी यांचे अल्पशा आजाराने निधन

सारा न्युज नेटवर्क 
सोलापूर (प्रतिनिधी):भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक सुनील कामाठी यांचे निधन झाले आहे. किडनी खराब झाल्याने त्यांच्यावर शहरातील अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. 
शुक्रवारी रात्री तब्येत अस्वस्थ कारणाने त्यांना अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते शनिवारी दिवसभर ते सर्वांशी बोलत होते.रविवारी दुपारी मात्र त्यांची तब्येत अत्यंत खालावली शेवटी सोमवार पहाटे पाचच्या दरम्यान त्यांचे निधन झाले.
या घटनेने खड्डा तालमीवर शोककळा पसरली आहे. भारतीय जनता पक्षामधूनही शोक व्यक्त केला जात आहे. कामाठी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

No comments:

Post a Comment