Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, February 6, 2023

परिवर्तन फाऊंडेशन चे कार्य कौतुकास्पद सहाय्यक पोलीस आयुक्त दिपक आर्वे साहेब

परिवर्तन फाउंडेशन च्या वतीने पत्रकार दिना निमित्त समाजकल्याण केंद्र येथे कांग्रेस कमिटी चे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली मा. सहा. पोलीस आयुक्त दिपक आवे यांच्या शुभहस्ते बाबासाहेब आंबेडकर कामगार युनियनचे अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले व डिजीटल मिडीया पत्रकार संघाचे विजयकुमार बाबर यांच्या उपस्थितीत ४० डिजीटल मिडीया, प्रिंट मिडीयाच्या पत्रकारांना गौरव सम्मान पत्र देण्यात आले या वेळी परिवर्तन फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष अशफाक शेख सर यांनी फाउंडेशन बद्दल माहिती दिली. 

सहाय्यक पोलिस आयुक्त आवे साहेब यांनी परिवर्तन फाऊंडेशनचे कार्य हे कौतुकास्पद असल्याचे सांगितले. कोग्रेस कमिटी चे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी काँग्रेस पक्ष नेहमी परिवर्तन फाऊंडेशनच्या पाठिशी आहे अशी ग्वाही दिली. बाबासाहेब आंबेडकर कामगार युनियनचे अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले यांनी सर्व पत्रकारांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी इरशाद शेख, सोहेल कुरेशी, सैफन शेख, रवी ढोबळे, तौसिफ शेख, अकील अलीम, रफिक बागवान, नसीमा सेतसंधी, सुनीताताई गायकवाड, लेला जमादार, भारती मनसेवाले, आदम मुजावर, इक्बाल शेख, इलियास बिजापुरे, आदी पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी परिवर्तन फाउंडेशन चे शहर अध्यक्षपदी अहमद कोतवाल व शहर युवा अध्यक्षपदी रितेश अष्ट्रळ यांची निवड करून निवडी चे पत्र चेतनभाऊ नरोटे यांच्या हस्ते देण्यात आले.

No comments:

Post a Comment