Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, February 17, 2023

नियमापेक्षा जास्त पैसे घेणारे तीन आधार केंद्र केले सील दीड लाखाचा दंड : भारतिय विशिष्ट ओळखपत्र प्राधिकरणाची कारवाई

 


सारा न्यूज नेटवर्क-

सोलापूर (प्रतिनिधी) :शासनाने दिलेल्या नियमाचे पालन न करता अवाच्या सव्वा बिल घेणारे तीन आधार केंद्रे सील करण्यात आले आहेत. भारतीय विशिष्ट ओळखपत्र प्राधिकरण ही कारवाई केली असून, संबधितांवर दीड लाखाचा दंड केला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सेतू मध्ये नेमण्यात आलेले आधारकेंद्र, दक्षिण सोलापूर तहसील कार्यालय परिसरातील आधारकेंद्र व नातेपुते येथील आधारकेंद्रावर गेल्या आठवड्यात ही कारवाई झाली आहे. आधारकेंद्रात जन्मलेल्या मुलापासून पाच वर्षापर्यंतच्या बालकांना आधारकार्ड तयार करण्यासाठी पैसे घेतले जात नाही. पाच वर्षा नंतर नाव, पत्ता किंवा अन्य काही बदल असेल तर त्यासाठी ५० रुपयाचा शुल्क लावला जातो.


भारतीय विशिष्ट प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी केलेल्या तपासणीमध्ये तिन्ही ठिकाणी लोकांकडून जास्त पैसे घेतल्याचे आढळून आले आहे.

जास्त पैसे मागितल्यास हेल्पलाइनवर संपर्क साधा १९४७     help@uidai.in वर मेल करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment