सारा न्यूज नेटवर्क _
सोलापूर :डी.एस.टी.एस.मंडळ संचलित, युनिक इंग्लिश मिडीयम च्या चि. शुभम तुकाराम चव्हाण या विद्यार्थ्याने दि. २२ जानेवारी २०२३ मध्ये गोवा येथे घेण्यात आलेल्या स्किल डो मार्शल आर्ट या खेळामध्ये राष्ट्रीय स्तरावर द्वित्तीय क्रमांक मिळवून रौप्य पदक प्राप्त केले आहे.
या स्पर्ध्येसाठी चे प्रशिक्षण श्री मंजूर शेख सरांनी केले. या स्पर्धेसाठी शाळेचे क्रिडा शिक्षक श्री. अमर पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेत प्रविण्य मिळविल्या बददल विद्यार्थ्यांचे, संस्थेचे अध्यक्ष, मा.श्री. राजशेखर शिवदारे सरांनी कौतुक केले. तसेच शाळेच्या शैक्षणिक सल्लागार सौ. अंजली तिवारी मॅडम व सदस्या डॉ. सौ. शुभदा उपासे मॅडम, व सदस्य श्री भिमाशंकर शेटे सरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पूजा बाजपेयी मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेतील सर्व शिक्षकव शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.
No comments:
Post a Comment