Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, February 10, 2023

GK मागासवर्गीय बहुउद्देशीय संशोधन संस्था यांच्या वतीने संत रोहिदास महाराजांची ६४६व्या जयंतीनिमित्त महिलासाठी हळदी-कुंकु, तिळगुळ व निराधार बालकांना शैक्षणिक साहित्याची वाटप

१०फेब्रुवारी २०२३
सोलापूर (प्रतिनिधी ) : 
संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त संध्याकाळी ठीक सहा वाजता संगमेश्वर कॉलेज, सात रस्ता सोलापूर मध्यवर्ती जयंती उत्सवाची औचित्य साधुन महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम व व समाज यातील गरीब गरजू मुला मुलींना शैक्षणिक साहित्याचे वाटप व संजय गांधी श्रावण बाळ योजनेचे मंजूर आदेश वाटप करण्यात आले
 या कार्यक्रमास शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे बँक ऑफ महाराष्ट्र सीनियर क्लार्क राजू डांबरे महिला बालकल्याण समिती सदस्या सौ. सुवर्णा कोकरे तसेच आश्रय वृद्धाश्रम समितीच्या संचालिका शिवगुंडे ताई जीके संस्थेच्या उपाध्यक्ष, सौ. रेणुका गायकवाड समाजसेविका, सौ.शितल डांबरे समाजसेविका सौ.गीता हुंडारे,कविता चव्हाण, सलोनी हुंडारे, गोदाबाई वाघमारे, पोपटबाई कांबळे, बीयामबाई बिजली, नजिरा शेख, सुनिता वाघमोडे, शैलेजा गोसावी, स्मिता विभुते, शशिकला पवार, कविता बायस, लक्ष्मण वाघमारे, लक्ष्मण जाधव, श्रीकुमार चव्हाण त्यांना संजय गांधी श्रावण योजनेचे मंजूर पत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच गोरगरीब निराधार मुला मुलींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी दुय्यम उपनिबंधक अधिकारी श्री खडतरे साहेब यांचा देखील सत्कार करण्यात आला. 
या कार्यक्रमास सुरेखा बोमणे, धोंडू शिंदे, संगीता कांबळे, अनुराधा जाधव, दिपक बोमणे, गनप्पा गणपा व सर्व समाजातील महिला मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment