सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर (प्रतिनिधी) : - श्री महालक्ष्मी गणेश उत्सव तरुण मंडळ सोलापूर यांच्या कडून श्री गणेश उत्सव निमित्ताने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
हे शिबीर रविवार 24 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी ९ ते ५ या दरम्यान श्री महालक्ष्मी मंदिर राघवेंद्र नगर सोलापूर येथे घेण्यात आले, या शिबिराचे नियोजन श्री मल्लिकार्जुन रक्तपेढी यांच्या मार्फत करण्यात आले, या शिबिरास परिसरातील नागरिकांनी व युवकांनी भरपूर प्रतिसाद देत उत्स्फूर्तपणे रक्तदान केले, या शिबिराच्या माध्यमातून एकूण 55 बाॅटल रक्त संकलन झाले.
हे रक्तदान शिबीर राघवेंद्र नगर व रामनारायण चंडक विहार यांच्या संयुक्त विद्यमाने येथील नागरिकांनी उस्फूर्त पणे सहभाग घेतला व हे शिबीर यशस्वी पणे पार पाडले. रक्तदात्यांना मंडळाचे वतीने आकर्षक भेटवस्तू देण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून मंडळाचे अध्यक्ष बालाजी रूपनर, उपाध्यक्ष प्रशांत शेवाळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. या रक्तदान शिबीरात एकुण 55 रक्तदात्यांनी रक्तदान केले. मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित रक्त दात्यांचे स्वागत करून त्यांना भेट म्हणुन उपहार देण्यात आले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment