Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, September 14, 2023

सिव्हिल हॉस्पिटल मध्ये तात्काळ सेवा द्या ! मानवाधिकार संरक्षण संघटनेची मागणी...

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर  (प्रतिनिधी) :- सोलापूर शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालय ( सिव्हिल हॉस्पिटल ) येथे सोलापूर शहर व जिल्ह्यातून अनेक रुग्ण येतात त्याचबरोबर अपघात झालेले रुग्ण येतात त्या ठिकाणी 17 नंबर ओपीडी मध्ये सध्याची परिस्थिती अशी आहे की अपघात किंवा अनेक गंभीर रुग्ण आल्यावर त्या ठिकाणी सीनियर डॉक्टर्स व अनुभवी डॉक्टर्स नसल्यामुळे रुग्णांना खूप मोठा त्रास होत आहे अपघात झालेले पेशंट व अनेक गंभीर पेशंट आल्यावर त्या पेशंट्स ना तात्काळ सेवा मिळत नाही.आणि तात्काळ सेवा मिळत नसल्यामुळे किती एक पेशंटची खूप मोठी कोंडी झाली आहे.


व 17 नंबर ओपीडी मध्ये अनेक गंभीर प्रश्न आहेत पेशंटच्या नातेवाईकांना तेथील डॉक्टर्स अरेरावीची भाषा करत आहेत या सगळ्या गोष्टीवर सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल चे वरिष्ठ अधिकारी गंभीर्याने लक्ष द्यावे म्हणून आज मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल चे वरिष्ठ अधिकारी यांना निवेदन द्वारे सिविल हॉस्पिटल येथे 17 नंबर ओपीडी मध्ये तात्काळ सेवा मिळण्यात यावी व तसेच त्या ठिकाणी रुग्णांना होत असलेल्या त्रास दूर करण्यात यावा म्हणून  मागणी करण्यात आली आहे.


त्यावेळी मानवाधिकार संरक्षण संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सादिक शेख महाराष्ट्र प्रदेश संघटक श्रीकांत कोळी , महाराष्ट्र संपर्क प्रमुख महबूब कादरी , सोलापूर जिल्हा अध्यक्ष( आरोग्य विभाग ) अकबर शेख, दुर्योधन भडकुंबे मल्लू पाटील प्रवेश मुल्ला नागनाथ गणपा अनेक मान्यवर उपस्थित होते.


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment