Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, September 28, 2023

सोलापूर जिल्हा कुरुहिनशेट्टी ( कोष्टी )समाज विकास मंडळ यांची 31 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न...

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर (प्रतिनिधी) :- श्री रामचंद्र म्हेत्रे सर मंद्रूप संस्कृत पंडित प्रवचनकार यांचे हस्ते  श्री. शंकर शिवाचार्य महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून 31 वी वार्षिक सभा दिनांक 18/09/2023 रोजी सकाळी ठीक 10/00 वाजता माननीय श्री गुरुपादप्पा कोकळगी यांचे अध्यक्ष ते खाली सुरुवात करण्यात आले. त्यानंतर अर्धा तास श्रावण महिना निमित्त श्री म्हेत्रे सर यांचे समाज बांधवांना प्रवचन झाले. 

त्यानंतर गेल्या वर्षभरात समाजातील दिवंगत समाज बांधवांना दोन मिनिटे सर्वजण उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. व सभेच्या कामकाजास सुरुवात करण्यात आले 

श्री चिदानंद परतबादी उपाध्यक्ष कोष्टी समाज यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले तसेच मागील वर्षभरातील जमा व खर्च वाचून दाखवले व त्यास मंजुरी घेतली. तदनंतर देणगीदारांचा , प्रमुख पाहुण्यांचा, सेवानिवृत्त समाज बांधवांचा, तालुका कार्यकारिणीचे अध्यक्ष, तसेच राज्य कार्यकारणी संचालक श्री बंडू गणगले ,श्री विकास पाटील तसेच विविध स्पर्धेमध्ये व शैक्षणिक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला मा.अध्यक्ष श्री गुरुपादप्पा कोकळगी, प्रमुख पाहुणे म्हेत्रे सर , उपाध्यक्ष,तसेच संचालक यांचे हस्ते करण्यात आला. यानंतर प्रमुख पाहुण्यांचे मनोगत व मार्गदर्शन झाले.


नंतर पुढील सन 2023 ते 2028 करिता नवीन कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आले त्यात नूतन अध्यक्ष म्हणून

 श्री.गुरुपादप्पा सन्मुख कोकळगी अ.कोट , 

उपाध्यक्ष म्हणून श्री चिदानंद परतबादी सोलापूर शहर, 

श्री अनिल कोणशिरसगी खजिनदार सोलापूर शहर, 

श्री संतोष म्हेत्रे .सचिव,सोलापूर शहर,

 तसेच संचालक 

श्री. संदीप कोकळगीअ.कोट, 

श्री विकास पाटील दक्षिण सोलापूर,

श्री अनिमेश चिखले,मंगळवेढा, 

श्री मनोज गुरव बार्शी

श्री मनोज चनाप्पा कोष्टी पंढरपूर.

श्री मल्लिनाथ जीपटे.सोलापूर शहर, 

श्री.गजेंद्र रामचंद्र गुरव.करमाळा,श्री.मधुकर देवरगुडी सोलापूर शहर,

सौ सुजाता पडनुर सोलापूर शहर, 

सौ संगीता कोरे सोलापूर शहर,

सौ मोनिका कोष्टी सोलापूर शर, यांची बिनविरोध निवड करण्यात आले व उपस्थित समाज बांधवांनी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

मा. अध्यक्ष श्री. गुरुपाद(आण्णा)कोकळगी यांनी समारोप प्रसंगी समाज बांधवांना मार्गदर्शन करून उपस्थित समाज बांधवांचे आभार मानून सभा संपलेचे जाहीर केले .सभेचे सूत्रसंचालन श्री संतोष म्हेत्रे यांनी केले.


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment