सारा न्यूज नेटवर्क -
मुंबई (प्रतिनिधी) :- ज्येष्ठ समाजसेवक आयुष्यमान गोविंदजी खटावकर साहेब यांच्या एकसष्टी पूर्ती निमित्त समाजामध्ये सर्वोत्कृष्ट सामाजिक कार्य करणाऱ्या समाजबांधव भगिनींचा राष्ट्रीय चर्मकार संग यांच्या कडून समाजसेवक व समाजसेविका असा सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार संघ संस्थापक अध्यक्ष माजी आमदार श्री बाबुराव माने व संत रविदास चर्मकार युवा महासंघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री दत्ताभाऊ आत्माराम कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला.
दिनांक ०३/०९/२०२३ वार रविवार रोजी मनोहर जोशी विद्यालय धारावी या ठिकाणी समाजामध्ये सर्वोत्कृष्ट सामाजिक कार्य करणाऱ्या समाजबांधव भगिनींचा समाजसेवक व समाजसेविका असा सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
हा पुरस्कार संत रविदास चर्मकार युवा महासंघ महाराष्ट्र खालील पदाधिकारी यांना देण्यात आला.
*समाजसेवक*
मा श्री दत्तात्रय आत्माराम कदम संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ( पुणे )*
*मा.श्री रमेश मारुती शिंदे प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य (मावळ पुणे )*
*मा.सौ. मनीषा उमेश ठवाल प्रदेश अध्यक्षा महाराष्ट्र राज्य ( मुंबई )*
*मा.श्री Adv. दत्तात्रय डोईफोडे खजिनदार महाराष्ट्र राज्य ( पुणे )*
*मा.श्री दिपक सिताराम खोपकर युवक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ( मुंबई )*
*मा.श्री ज्ञानदेव काशिनाथ कदम कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य ( मावळ, पुणे )*
*मा.श्री देवप्पा यल्लप्पा शिंदे सचिव महाराष्ट्र राज्य ( पुणे )*
*मा.श्री सचिन बापूराव खरात उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य ( मुंबई )*
*मा.श्री किरण सुरेश बागडे युवा कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य ( पुणे )*
*मा.श्री गजानन लिंबोरे युवक प्रवक्ते महाराष्ट्र राज्य ( मुंबई )*
*मा.श्री सुनील सहदेव नेटके युवक उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य ( मुंबई )*
*मा.श्री विलास गुणाजी धस मुंबई अध्यक्ष ( मुंबई )
यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करून गुणगौरव करण्यात आला. यावेळेस हा सन्मान मिळाल्याबद्दल संत रविदास चर्मकार युवा महासंघ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष आदरणीय दत्ताभाऊ आत्माराम कदम बोलले की, आम्हाला मिळालेला सन्मान हा आम्हाला नेहमीच प्रिय राहील शिवाय या मुळे भविष्यात अजून जोमाने समाज कार्य करण्यासाठी प्रेरित करेल, हा सन्मान आजच्या पिढीला, समाजाला ऊर्जा, प्रेरणा, प्रोत्साहन देणार आहे, या सन्मानामुळे समाजकार्य करण्याची जबाबदारी अजून वाढली आहे समाजकार्याचा घेतलेला वसा नक्कीच आम्ही पूर्णत्वास घेऊन जाऊ अशे वचन देतो, आपण आमच्या समाजकार्याची दखल घेऊन या कार्याची पोच पावती दिल्याबद्दल मान्यवरांचे आभार मानले व तसेच संत रविदास चर्मकार युवा महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या माध्यमातून आज पर्यंत समाज बांधवांना ५०० संविधान पुस्तकं, प्रती व संत रविदास महाराज यांच्या प्रतिमा देण्यात आल्या, या सोहळ्यानिमित्त ही माजी आमदार बाबुराव माने साहेब व ज्येष्ठ समाजसेवक आयुष्यमान गोविंजजी खटावकर साहेब यांचा ही संविधान व संत रविदास महाराज यांची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले, संत रविदास चर्मकार युवा महासंघ महाराष्ट्र सीडी राज्य पदाधिकारी दत्ता चाबुकस्वार, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री पितांबर शिंदे अनेक मान्यवर, पदाधिकारी समाज बांधव यांच्या उपस्थिती मध्ये कार्यक्रम पार पडला.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment