Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, September 28, 2023

शाम ढवळे यांचा 50 वा वाढदिवस मित्रपरिवारा कडून उत्साहात साजरा...

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर (प्रतिनिधी) :- मध्य रेल्वे सोलापूर येथे मुख्य तिकीट क्लार्क या पदावर कार्यरत असलेले, मध्य रेल्वेचे कार्यतत्पर कर्मचारी, आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ असणारे, एक दिलखुलास आणि जीवनाचा मनमुराद आनंद लुटणारे व्यक्तिमत्व श्री शाम ढवळे यांचा 50 वा वाढदिवस मित्रपरिवारा कडून अतिशय आनंदात साजरा करण्यात आला. 

त्यावेळी मित्रपरिवार कडून शाम आणि त्यांच्या पत्नी उज्ज्वला ढवळे यांचा फेटा बांधून हार घालून पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. व पुढील निरोगी आनंददायी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. 


याप्रसंगी पुणे येथे LIC मध्ये कार्यरत अशोक साळुंखे, दयानंद विधी महाविद्यालयात कार्यरत अनिल प्याटी, मुंबई येथील व्यापारी रवी नारायणकर, सोलापूर जिल्हा न्यायालयातील वरिष्ठ लिपिक राम मोतीवाले, व्यावसायिक शंकर कल्पवृक्ष, सोलापूर महसूल विभागात कार्यरत उदय शिवशिंगवाले व पत्रकार सुरक्षा समितीचे शहर अध्यक्ष तथा सारा न्यूज नेटवर्कचे संपादक राम हुंडारे यांची उपस्थिती होती.



तसेच सोलापुरातील भारती विद्यापीठ समोरील सुप्रसिद्ध हॉटेल साई स्वाद येथील हॉटेलचे मालक आणि हॉटेल मधील स्टाफ यांनी शाम ढवळे यांचा वाढदिवसानिमित्त केक कापून वाढदिवस साजरा केला. 


यावेळी हॉटेल चे मालक सादिक नदाफ, गणेश सावंत, हनिफ भाई आणि शिवलिंग दुधनी, प्रकाश जाधव सुफियान नदाफ, सचिन जोगदिया, शाहिर भाई, पटेल, शामल दत्ता व इतर स्टाफ उपस्थित होते.


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे



No comments:

Post a Comment