Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, September 25, 2023

सोलापुर परिवहन उपक्रमातील गणपतीची पुजा सो म पा चे अतिरिक्त आयुक्त संदिप कारंजे यांच्याहस्ते संपन्न...

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर (प्रतिनिधी ):- महानगर पालिका उपक्रमातील सात रस्ता डेपोत जर वर्षी प्रमाणे गणपती उत्सव साजरा केला जातो. 

परिवहन उपक्रमातील सर्व हिंदु मुस्लिम बांधव एकत्रित येऊन सात रस्ता बस डेपोत गणेशोत्सव साजरा केला जाते. 

त्याच अनुषंगाने सात रस्ता येथे डेपोत गणपती  बसविण्यात आला  असून  आज सोलापुर महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदिप कारंजे यांच्या शुभहस्ते पुजा करण्यात आली.

अतिरिक्त आयुक्त संदिप कारंजे यांनी पुजेत उपस्थित राहिल्याबद्दल परिवहन उपक्रमातील मुख्य वाहतूक निरीक्षक सतीश गुंड फोरमन बेंद्रेकर वाहतूक निरीक्षक नागेश म्हेत्रे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात  आल अतिरिक्त आयुक्त संदिप कारंजे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.मुख्य वाहतूक निरीक्षक सतीश गुंड त्याचबरोबर वाहतूक निरीक्षक नागेश म्हेत्रे यांनी या कार्यक्रमाबद्दल अधीक माहिती दिली 


या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त संदिप कारंजे यांच्यासह मुख्य वाहतूक निरीक्षक सतीश गुंड वाहतूक निरीक्षक नागेश म्हेत्रे,फोरमन बेंद्रेकर वाहक अनिल बागले,वाहतूक निरीक्षक अनिल चौगुले,वाहतूक निरीक्षक आण्णाप्पा शिरनाळ,सेवामदतनी शहाजी भोजणे  ज्ञानेश्वर ठोकळे मारुती शिरसीकर राजु साखरे,यांच्यासह परिवहन उपक्रमातील कर्मचारीवर्ग बहुसंखेने उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाहतूक निरीक्षक नागेश म्हेत्रे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार वाहक अनिल बागले यांनी मांडले.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment