Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, September 4, 2023

विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचा ४६ वा वर्धापन दिन साजरा...

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्यातील वीज क्षेत्रातील अग्रगण्य अशा विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन ( १०२९ ) चा ४६ वा वर्धापन दिन विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. 


विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, आरोग्य शिबिर व स्वच्छता मोहीम घेण्यात आले. सोलापूर मंडळ कार्यालय समोर संघटनेचा ४६ वा वर्धापन दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.



       याप्रसंगी सोलापूर शहर ई उपविभाग अतिरिक्त कार्यकारी अभियंता मा. श्री. प्रदीप मोरे साहेब यांनी संघटनेच्या सर्व सभासद बंधू-भगिनींना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. बारामती परिमंडळ पदाधिकारी ओंकारनाथ गाये यांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले. विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन सोलापूर मंडळ अध्यक्ष सुनिल काळे यांनी देखील वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले. प्रतिभा येळगे, सुंदर गायगवळी, अनीसा मुलाणी, एम. एम. करजगीकर, दत्तात्रय शिंदे, रवींद्र तुळजापूरकर, सिद्धेश्वर क्षीरसागर, सी. एम. पवार, कीर्तीकुमार वेळापूरे, जिक्रिया सय्यद, अश्विन भांगे, शिवशंकर बिराजदार, दयानंद पाटील, राहुल शिर्के, प्रशांत बामणे, श्रीराम सलवदे, पंडित कुंभार, संजयकुमार स्वामी, मनोज कलशेट्टी, शब्बीर पटेल, दत्ता कांबळे, रमेश कोळी, जनार्दन काकी, नरेंद्र भंडारी, लक्ष्मीपुत्र बिराजदार व इतर सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment