Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, September 24, 2023

गुरववाडी गावचे विकासरत्न तथा सरपंच म्हाळप्पा पुजारी यांची स्मार्ट महाराष्ट्र न्यूज कार्यालयास सदिच्छा भेट...

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर (प्रतिनिधी) :- अक्कलकोट तालुक्यातील गुरववाडी गावचे विकासरत्न तथा  सरपंच म्हाळप्पा पुजारी यांनी स्मार्ट महाराष्ट्र न्यूज कार्यालयास सदिच्छा भेट दिली.तसेच श्री गणेशाच्या प्रतिमेचे पूजन सरपंच म्हाळप्पा पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले सदर प्रसंगी स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चैनलचे संपादक वाघ साहेब यांच्या शुभहस्ते सरपंच म्हाळप्पा पुजारी सत्कार करण्यात आला. यावेळी पुजारी यांनी स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 


स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चैनलचे संपादक वाघ साहेब यांच्या शुभहस्ते पत्रकार सुरक्षा समितीचे शहर अध्यक्ष राम हुंडारे यांचाहि सत्कार करण्यात आला. 





याप्रसंगी जीके मागासवर्गीय बहुउद्देशीय संशोधन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष दादा गायकवाड, सारा न्यूज नेटवर्कचे संपादक तथा पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर शहराध्यक्ष राम हुंडारे, सिध्दार्थ भडकुंबे आदी उपस्थित होते.


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment