Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, September 25, 2023

राहण्यासाठी दिले घर, केला कब्जा.! सोलापुरातील खळबळजनक घटना...

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर (प्रतिनिधी ):-  मौजे कुलकर्णी तांडा, ता. दक्षिण सोलापूर, जि.सोलापूर येथील ग्रामपंचायत नमुना नं.८-अ, अ.क्र. ९३५, मिळकत क्र. ३० याचा मुळमालक गुंडु गोपू राठोड हे आहेत.परंतु गुंडु रुपा राठोड यांचे संपुर्ण कुटुंब विहिर खोदकाम काम करण्याकरीता बाहेरच्या जिल्हयात जात असताना, रमेश गुंडु चव्हाण हा मला राहण्यासाठी घर नाही. ४-५ महिन्याकरीता आपले घर राहण्याकरीता दयावे व आपण परत आले की, मी आपले घर सोडून देतो असे विनंती केल्यामुळे व गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती सांगीतल्यामुळे मुळमालक यांनी रमेश गुंडु चव्हाण यांच्या ताब्यात स्वतःचे घर जागा देऊन विहिर खोदकामानिमित्त बाहेर जिल्हयात गेले होते.


परंतु त्या ठिकाणी जास्तीचे काम असल्यामुळे पिडीत कुटुंब ४ ते ५ वर्षे सोलापूर येऊ शकले नाहीत. याचा गैरफायदा घेऊन रमेश गुंडु चव्हाण यांनी वरील दर्शविलेल्या मिळकतीवर ग्रामसेवक, हयांना हाताशी धरुन वडिलोपार्जित असलेल्या स्वतःच्या घरातील लाईट मिटर काढुन वरील मिळकतीमध्ये बसवून त्याठिकाणी पिठाची चक्की काढुन व्यवसाय स्वरुपात सुरुवात केली आहे.


मौजे कुलकर्णी तांडा तालुका दक्षिण सोलापूर येथील ग्रामपंचायत नमुना 8 अ अ क्र 935 मिळकत क्र 30 या घर जागेवर बेकायदेशीरपणे ग्रामसेवक पुढारी यांना हाताशी धरून घर जागा हडप केल्याबाबत पोलीस खात्यामार्फत चौकशी होऊन रमेश गुंडू चव्हाण यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे बाबत मौजे कुलकर्णी तांडा येथील सरपंच ग्रामसेवक गट विकास अधिकारी पोलीस निरीक्षक यांची संयुक्त बैठक उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या दालनात लावण्यात यावी व पिढीत कुटुंबाला न्याय देण्यात यावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ बेळेनवरू यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पूनम गेट येथे धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनात लैला आष्टुल (महिला शहर अध्यक्ष ) दशरथ चव्हाण (शहर अध्यक्ष ) केशव चव्हाण शहर उपाध्यक्ष भारती मनसावाले महिला शहर मध्य विधानसभा अध्यक्ष रवींद्र पवार शहर कार्याध्यक्ष सरदार चव्हाण शहर अध्यक्ष इत्यादी धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत.


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment