Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Monday, September 25, 2023

*सुवर्णाताई झाडे यांची महिला सुरक्षा संघटनेच्या सोलापूर जिल्हा प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल गुरववाडीचे सरपंच म्हाळप्पा पुजारी यांच्या हस्ते सत्कार.*

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर(प्रतिनिधी) :- महिला सुरक्षा संघटना नवी दिल्ली भारत सरकार मान्यता प्राप्त पद नियुक्तीचा कार्यक्रम सोलापूर येथे संपन्न झाला. दरम्यान उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी गावच्या महिला सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णाताई झाडे खेलबुडे यांची महिला सुरक्षा संघटनेच्या सोलापूर शहर जिल्हा प्रमुख पदी निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडीबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.यावेळी अक्कलकोट तालुक्यातील गुरववाडीचे विकासरत्न तथा सरपंच म्हाळप्पा पुजारी यांनी मार्डी येथील सुवर्णाताई झाडे यांच्या स्वगृही सदिच्छा भेट देऊन त्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.







यावेळी गणेशोत्सवानिमित्त प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या सुवर्णाताई झाडे यांच्या घरातील गणरायाच्या प्रतिमेचे पूजन सरपंच माळाप्पा पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले.तदनंतर सुवर्णाताई झाडे व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी सरपंच म्हाळप्पा पुजारी यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला.


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment