Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, September 30, 2023

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक यशस्वीरीत्या पूर्ण, यंदा डिजेला फाटा देत डॉल्बीमुक्त मिरवणूक संपन्न...

 



सोलापूर (प्रतिनिधी) :- विजापूर रोड मध्यवर्ती गणेश उत्सव महामंडळाचे डॉल्बी मुक्त मिरवणूक व शांततापूर्व पारंपरिक वाद्य मिरवणूक यशस्वीरिता पूर्ण,उत्सव अध्यक्ष महेश देवकर यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा यशस्वीपणे पार पडला. 



       सर्वत्र "डॉल्बीमुक्त संदेश व वृक्षसंवर्धन संदेश" तसेच "say to no plastic" सामाजिक पर्यावरण संवर्धनाचे प्रबोधनात्मक फलक ही लावण्यात आले प्रत्येकाने एक रोप एक पिशवी देऊन जागर करण्यात आला उपस्थित मान्यवर मा सहकार मंत्री सुभाषजी देशमुख यांचे चिरंजीव युवा नेतृत्व श्री मनीष भैया देशमुख ,सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे मॅडम विजापूर नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक श्री राजकुमार वाघचवरे  पोलीस निरीक्षक विद्या जाधव व सर्व मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष श्री महेश देवकर पदाधिकारी मार्गदर्शक सल्लागार मा.आमदार शिवशरण पाटील विजय शाबादी सुभाष चव्हाण श्री विश्वनाथ आमने सर सर अश्विनीताई चव्हाण या मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशाची पूजा करून मध्यवर्ती महामंडळाच्या व्यासपीठ चे उद्घाटन करून सुरुवात झाली, सर्वांच्या सहकार्य तसेच मध्ये येणाऱ्या सर्व गणेश मंडळांचे ट्रॉफी प्रमाणपत्र एक रोप एक कापडी पिशवी देऊन सन्मानही करण्यात आला तसेच मान्यवर पत्रकारांचा ही सन्मान करण्यात आला शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा पर्यावरण प्रेमींचा सामाजिक कार्य करणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तींचा हे येतोचित सन्मान करण्यात आला. 


मिरवणूक पाहणी करणाऱ्या  सोलापूर पोलीस आयुक्तालय चे समीक्षक पथक यांनी उत्कृष्ट गणेश मंडळाचे पाहणी करून गुणांकन हे करण्यात आले समीक्षक पथक चे समन्वयक डॉ मनोज देवकर व त्यांचे पूर्ण सर्व समीक्षक पथक अॅड.माणिक राठोड, लेखिका प्रांजल मोहीरकर डॉ अनिता पवार प्रा.अश्विन नागणे प्रा. नानासाहेब गव्हाणे यांचेही यथोचित सन्मान करण्यात आला समाजामध्ये सलोखा राखणाऱ्या मुस्लिम बांधव यांचे सन्मान करण्यात आला, 


तसेच मा. सहकार मंत्री विद्यमान आमदार सुभाष देशमुख तसेच युवा नेतृत्व मनीष भैया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश भक्तांना व पोलीस बांधवांना महाप्रसादाचा आयोजनही करण्यात आले होते अशा उत्तम हा गणेशोत्सव सोहळा आनंदात व शांततेत पार पडला. 


   पोलीस बांधवांचा ही सन्मान करण्यात आला सर्व पोलीस बांधव यांचे विशेष सहकार्य लाभले. 

आरोग्य सेवा : भक्तांसाठी आरोग्य सेवेसाठी डॉ राठोड व औषधांचीही उपलब्धता करण्यात आली होती तसेच इमर्जन्सी साठी ॲम्बुलन्स ही महामंडळ येथे उपलब्ध केली होती. 




विशेष सहकार्य :लोकमंगल फाउंडेशन  सहकार मंत्री विद्यमान आमदार सुभाष जी देशमुख व  विकास तंबाके यांच्या प्रयोजनाने ट्रॉफी व इको नेचर क्लब  माध्यमातून प्रमाणपत्र एक रोप व आपटे कापडी पिशवी देऊन पर्यावरणाचा जागर व मान्यवर व सर्व गणेश मंडळांच्या अध्यक्षांचा व  विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा सन्मानही करण्यात आला. 



सूत्रसंचालन : श्री विश्वनाथ आमने सर व लेखिका प्रांजली मोहरकर यांनी उत्तम सूत्रसंचालन करून येणाऱ्या मंडळाचे आपल्या शब्दांनी स्वागत करून प्रबोधनात्मक संदेश महामंडळाकडून देण्यात आले. 


गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या.!


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment