सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर (प्रतिनिधी) :- वाढदिवस हा मनुष्याच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण दिवस असतो. त्यामुळेच वाढदिवस सर्वचजण साजरा करतात,गरीब असो वा श्रीमंत काही लोक या दिवशी घरी धार्मिक अनुष्ठान करतात तर काही जण या दिवशी आपल्या मित्र आणि नातेवाईकांसमवेत पार्टी करतात.परंतु GK मागासवर्गीय बहुउद्देशीय संशोधन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष(दादा) गायकवाड यांनी स्वतःच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत कुष्ठरोग वसाहत कुमठा नाका,सोलापूर येथील गोर-गरीब निराधार,अनाथ लोकांसाठी ४०हून अधिक जेवणाची पाकिटे बनवून अन्नदान केले.त्यांच्या या विधायक कार्याचे स्तरातून कौतुक होत आहे.
याप्रसंगी ओम साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवराज(दादा) गायकवाड आणि पत्रकार सुरक्षा समितीचे शहर अध्यक्ष तथा सारा न्यूज चे संपादक राम हुंडारे यांनी संतोष गायकवाड यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment