Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, September 29, 2023

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे राम हुंडारे यांचा सत्कार, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रधान...

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर (प्रतिनिधी) :- विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळा तर्फे दरवर्षी धार्मिक, सामाजिक, कला, क्रिडा, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, संस्था तसेच गणेश मंडळ यांचा करत असलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येत असतो. याही वर्षी विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ति, संस्था व गणेश मंडळ यांचा सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.


पत्रकार सुरक्षा समितीचे शहर अध्यक्ष तथा सारा न्यूज नेटवर्कचे संपादक राम हुंडारे यांचा सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे मॅडम यांच्या हस्ते सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. 




यावेळी मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे उत्सव अध्यक्ष श्री महेश देवकर, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा ) प्रांजली सोनवणे मॅडम, विजापूर नाका पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघचवरे, केअर हॉस्पिटलचे चेअरमन डॉ मल्लिकार्जुन तरनल्ली, पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर समीक्षक पथक समन्वयक डॉ मनोज देवकर, उत्सव कार्याध्यक्ष संदिप साळुंके, उत्सव सचिव चेतन चौधरी, नगरसेविका अश्विनीताई चव्हाण, विजापूर रोड मध्यवर्तीचे संस्थापक विजय शाबादी,पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर समीक्षक प्रांजली मोहिकर आदि मान्यवर उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment