Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, September 6, 2023

डॉ. मनोज देवकर यांना शिक्षक दिनी निसर्ग शिक्षक मानपत्र प्रदान...

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर (प्रतिनिधी) :- शिक्षक दिनानिमित्त हरिभाई देवकरण प्रशाला येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ. मनोज देवकर यांना 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन या शिक्षक दिना दिवशी निसर्ग शिक्षक मानपत्र देऊन हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर शिक्षण प्रसारक मंडळी पुणे तसेच पालक शिक्षक संघ यांच्या माध्यमातून मानद निसर्ग शिक्षक पदवी बहाल करून त्यांचा गौरव करण्यात आला. 


त्यांचे आजपर्यंत पर्यावरण क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य तसेच शाळा महाविद्यालय व प्रत्येक संस्थेमध्ये त्यांनी केलेल्या वृक्ष लागवड व संवर्धन तसेच पर्यावरणाचा जागर या दिलेल्या मूल्यवान पर्यावरण शिक्षण  त्यानी अनेक लोकांमध्ये शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये जनजागृती घडून पर्यावरण समतोल साधण्याचा एक प्रयत्न ते करत आहात त्यांचा या कार्याचा कृतिशील अहवाल पाहता निसर्ग शिक्षक म्हणून त्यांना मानपत्र देऊन गौरव करण्यात आले. 


उपस्थितीत मुख्याध्यापक श्री प्रकाश कांबळे संस्थेचे अध्यक्ष श्री राजेश पटवर्धन पर्यवेक्षक श्री हनुमंत मोतीबंदे पालक शिक्षक संघ प्रतिनिधी श्री अनिल जेतुरी व सर्व शिक्षक वर्ग व पालक संघ यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला तसेच इको नेचर क्लबच्या माध्यमातून सर्व शिक्षक व पालक वर्ग यांना वृक्ष लागवडीसाठी शंभर रोपे देण्यात आले तसेच शाळेमध्ये ही वृक्षारोपण करण्यात आले पालक संघामध्ये पुनम भांगे व स्मिता कोर्टीकर यांनी उत्तम नियोजन केले.


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment