Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, September 7, 2023

पर्यावरण पूरक इको फ्रेंडली गणपती बनवण्याची कार्यशाळा संपन्न...



 
सोलापूर (प्रतिनिधी) :- सह्याद्री प्रशाला दमाणी नगर येथे मातीचा गणपती बनवण्याची कार्यशाळा पार पडली इको नेचर क्लबचे ब्रँड अँबेसिडर युवा कलाकार कुमारी मनाली जाधव यांनी उत्तम प्रकारे मातीचा गणपती बनवण्याची कार्यशाळा घेतली आणि मुलांना व्यवस्थितपणे पर्यावरण पूरक मातीचा गणपती कसा तयार करायचा याचे प्रशिक्षण दिले. 

तसेच इकोनेचर क्लबचे अध्यक्ष पर्यावरण दूत डॉ मनोज देवकर यांनी प्रत्येक प्रशिक्षणार्थ एक रोप भेट दिले एक गणपती एक रोप असा संकल्प करून पर्यावरणाचा जागर करण्यात आला या उपक्रमाचे आयोजन इको नेचर क्लब सन्माननीय सदस्य शिवसेना शहर संघटिका अश्विनी भोसले व इको नेचर क्लबचे सन्माननीय सदस्य व शिवसेना उपशहर प्रमुख नीलम अर्जुन यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते तसेच शाळेचे संचालक Adv. संतोष चव्हाण कार्याध्यक्ष माऊली अवताडे शाळेचे मुख्याध्यापक श्री साखरे सर आदींनी शाळेतील मुलांना मातीचा गणपती बनवण्यात व कार्यक्रमाचे नियोजन केले. 




प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना जिल्हा शहरप्रमुख अमोल बापू शिंदे तसेच शहर प्रमुख मनोज भाईजी शेजवाल तसेच युवासेना प्रमुख सागर शितोळे जिजाऊ ब्रिगेडच्या प्राध्यापक मीनाक्षी जगदाळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यशाळा पार पडले सोलापूरचे सुप्रसिद्ध शिल्पकार शिवश्री नितीन जाधव व अभिंजीलीताई जाधव यांच्या कन्या कुमारी मनाली जाधव यांनी अनेक कार्यशाळा घेऊन पर्यावरणचा जागर करत आहेत तसेच त्याबरोबर डॉ मनोज देवकर हे प्रत्येकाला रोप भेट देऊन पर्यावरण संरक्षण करत आहेत आलेल्या सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले तसेच मान्यवरांचे प्रबोधनात्मक पर्यावरण विषयक उत्तम मार्गदर्शन विद्यार्थ्यांना उपस्थितीना सूचनात्मक संदेश देण्यात आले.


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे



No comments:

Post a Comment