Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, September 13, 2023

महीला बचत गटाची सामुदायिक मिटिंग गुरववाडी ता.अक्कलकोट येथे संपन्न...

 



सारा न्यूज नेटवर्क - 

अक्कलकोट (प्रतिनिधी) :- मौजे गुरववाडी, तालुका अक्कलकोट येथे 12.9.2023 रोजी महिला बचत गट सामुदायिक मीटिंग ग्रामपंचायत कार्यालय गुरववाडी येथे सरपंच सौ लक्ष्मी माळाप्पा पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग घेण्यात आले. ही मीटिंग सर्व महिलांनी मिळून खेळीमेळीचे वातावरणात पार पडली. 


या मिटिंगमध्ये सर्व महिलांना बचत गटा संबंधी माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माळाप्पा पुजारी यांनी मार्गदर्शन केले. तसेच ग्रामसेवक के.जी.मकानदार व महिला गटाचे प्रमुख व अध्यक्ष अनिता भेगेश मोती यांचेही मार्गदर्शन पण भाषण झाले. 


याप्रसंगी उपसरपंच सौ जगदीश स्वामी,ग्रामपंचायत सदस्य अंबावा कोळी, सारिका वंकारी, मल्लिकार्जुन इंगळगी, तसेच, महिला सदस्या सौ. सुजाता स्वामी. शिलवंती स्वामी, कमलाबाई आलूरे, लक्ष्मी पुजारी, लक्ष्मी लोणी, नागमा माशाळे, पार्वती मोती, कन्या बाबलाद, सुगलाबाई कांबळे, ज्योती कोळी, शोभा साखरे, बहुसंख्य बचत गट महिला सभासद उपस्थित होते.


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment