सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर जिल्ह्याचे विद्यमान खासदार मा.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांची अक्कलकोट तालुक्यातील गुरववाडी गावचे विकासरत्न म्हाळप्पा पुजारी यांनी महास्वामीजी यांच्या सोलापूर येथील संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट घेऊन गुरववाडी गावच्या विविध गाव विकास कामासंदर्भात झालेल्या कामाची माहिती देऊन व चर्चा करून निवेदन सादर केले.
तसेच नव्यानेच गुरववाडी गावच्या तंटामुक्त अध्यक्षपदी माजी सरपंच रविकिरण स्वामी यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून त्यांची सदिच्छा भेट खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या सोबत केली,
यावेळी माजी सरपंच रविकिरण स्वामी यांचा सत्कार खासदार जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आला.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment