Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, September 17, 2023

दक्षिण सोलापूर( मंद्रूप) येथे पर्यावण पूरक गणपती बनवण्याची कार्यशाळा संपन्न...

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूर(प्रतिनिधी) :- दक्षिण सोलापूर मंद्रुप येथे पर्यायवरण पूरक गणपती बनवण्याची कार्यशाळा पार पडली. त्याचे आयोजक Speeak well Classes Patils व कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे इको नेचर निसर्ग संवर्धन सहकारी संस्थेचे चे मुख्य प्रवर्तक डॉ मनोज देवकर होते उपस्थित मान्यवर ग्रामसेवीका सरीता राठोड,जयकुमार व्हनकामळे, बक्षीस वितरण ज्यांच्या हस्ते झाले असे प्रमुख पाहुणे युवा उद्योजक  सचिन चव्हाण,अनिकेत पाटील यावेळेस प्रशिक्षक श्रीमती कुंभार ताई राधीका कुंभार किर्ती कुंभार यांनी विद्यार्थी व पालक यांना पर्यावण पूरक गणपती मुर्ती बनवण्यास प्रशिक्षण दिले। 


हा कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी अश्विनी व्हनकामळे,   जयमाला गायकवाड, स्वाती स्वामी, साक्षी स्वामी, आयशा सय्यद प्राजक्ता यांनी काम पाहिले। 


कार्यक्रम ची सागता सर्व सहभागी विद्यार्थी यांना ECONATUE CLUB  प्रमाणपत्र देण्यात आले, तसेच "एक गणपती एक रोप" हा संकल्प करण्यात आला। 


तथा  प्रारंभी  पाटील टीचर यांनी प्रास्ताविक करून प्रमुख अतिथी चा सत्कार करण्यात आला यावेळी डॉ मनोज देवकर यांनी पर्यावरणाचा जागर करून निसर्ग वाचूया व पर्यावरण पूरक गणपती बसूया तसेच झाडे लावणे व आपल्या प्रत्येक सणा मग वृक्षाचे महत्व आहे व उपस्थित विद्यार्थ्यांना प्रबोधनात्मक पर्यावरण पूरक गोष्टीचे महत्त्व पटवून दिले उपस्थित प्रशिक्षणार्थींना पर्यावरणाचा जागर करण्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांना झाड रोप हे गिफ्ट दिले जेणेकरून निसर्गातली पुढची पिढी तयार होणे गरजेचे आहे.

 या उपक्रमाचे आयोजन स्पिकवेल क्लासेस पाटील ग्रुप सौ प्रियंका ताई पाटील व अनिकेत पाटील यांनी केले होते.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment