सारा न्यूज नेटवर्क -
पत्रकार सुरक्षा समितीचा आदर्श पत्रकार पुरस्काराने विक्रम वाघमारे सन्मानित
फलटण (प्रतिनिधी ) :- पत्रकार सुरक्षा समिती वतीने महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर नेहमीच आवाज उठवला असून ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना राज्यातील पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता यादीवर नसलेल्या राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी यासह पत्रकारावर होणारे हल्ले धमकी मारहाण याबाबत पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आंदोलन उपोषण निवेदन व पत्र व्यवहार केला जात आहे राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नाबरोबरच एक सामाजिक बांधिलकी म्हणून समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व प्रसिद्धी माध्यमा पासून दूर असणाऱ्या समाजात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना पत्रकार सुरक्षा समिती वतीने दरवर्षी सन्मानपत्र सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला जातो पत्रकार सुरक्षा समितीचा 2024 चा आदर्श पत्रकार म्हणून फलटण जिल्हा सातारा येथील साप्ताहिक कार्यसम्राटचे युवा पत्रकार विक्रम वाघमारे यांना पुरस्कार देण्यात आला
. युवा पत्रकार विक्रम वाघमारे यांनी समाजातील तळागाळांचे प्रश्न प्रशासन दरबारात मांडले वंचित पीडित अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त लोकांच्या प्रश्नावर साप्ताहिक कार्यसम्राट च्या माध्यमातून आपल्या तसेच लेखणीच्या माध्यमातून नेहमीच आवाज उठवला आहे. युवा पत्रकार विक्रम वाघमारे यांचा फलटण येथे पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांच्या हस्ते सन्मानपत्र सन्मानचिन्ह व शाल घालून सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद पत्रकार मनोज गायकवाड फलटण येथील सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते पैलवान युवराज जाधव उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment