सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर लोहमार्ग पोलीसांची चांगली कामगीरी;
प्रसुतीच्या कळा येणा-या महिलेस दिले मायेचा ऊब..
सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे कडेस मिळालेल्या माहीती प्रमाणे गाडी कं. ११०१९ कोणार्क एक्सप्रेस गाडीचे बोगी न बी/४ बर्थ नं ५० वरून महिला नामे सुभद्रा कामेश्वर साहु वय २७ वर्षे राह. भुवनेश्वर ही तिच्या पतीसह प्रवास करीत असताना सदर महिलेस कुर्डूवाडी रेल्वे स्टेशनपासूनच प्रसव वेदना तीव्र झाल्याने गाडीतील ऑन ड्युटी टिसी यांनी रेल्वे पोलीसानां संपर्क करताच तेव्हा तात्काळ स्टेशनवर हजर असेलेले रेल्वे पोलीस व आरपीएफचे कर्मचारी यांनी स्टेशनवरील अश्विनी हॉस्पीटलचे ओपीडीतील वैदयकिय अधिकारी यांना सोबत घेवून सदर रेल्वे गाडी ही सोलापूर रेल्वे स्टेशनवर येताच नमुद तात्काळ महिलेची तपासणी करून तिस जास्त त्रास होत असल्याने पुढील उपचारकामी अश्विनी हॉस्पीटल सोलापूर येथे पाठविण्यात आले.
त्यावेळी सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणेकडील महिला पोलीस अंमलदार १) पल्लवी रहागंडाले म. पो कॉ ब नं १४२८, २) वैष्णवी दबडे म. पो कॉ ब नं १४५२ यांनी मोलाची साथ देवून सदर महिलेस मायेची ऊब दिली.
सदरच्या मदतीमध्ये सोलापूर रेल्वे स्टेशनवर रात्रपाळी डयुटीस असणारे पोलीस उप निरीक्षक एस एन जाधव, पोलीस उप निरीक्षक एस एल भाजीभाकरे, पो हवा १२०४ आर डी पवार, पो हवा ६८० ओ व्ही पाटील, पो कॉ १६८ बनसोडे, पो कॉ १८८ एच एम जाधव, पो कॉ इंगीले यांनी मोलाची साथ दिली आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment