Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, July 8, 2024

ब्रेकिंग..! मुंबईत जोरदार पाऊस; लाईफलाईन ठप्प.. शाळा, महाविद्यालयाना सुट्टी जाहीर..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

ब्रेकिंग..! मुंबईत जोरदार पाऊस; लाईफलाईन ठप्प.. 

शाळा, महाविद्यालयाना सुट्टी जाहीर.. 



मुंबई (प्रतिनिधी) :- पावसाची मुंबईत जोरदार बॅटिंग सुरू आहे. कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज सकाळपासून देखील मुंबई, ठाणे, पालघर परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई महानगरात काल मध्यरात्रीनंतर एक वाजेपासून ते आज सकाळी सात वाजेपर्यंत या सहा तासांत रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झाली आहे. तब्बल तीनशे मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याने पुरस्थिती निर्माण झाली आहे.




 पावसामुळे लोकल सेवेवर देखील परिणाम झाला आहे. पुढील काही तासात पावसाचा जोर वाढणार असल्याने मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांच्या पहिल्या सत्रासाठी सुट्टी जाहीर केली आहे. तसेच कामाला जाणाऱ्या नोकरदार वर्गाला काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा पाऊस ढगफुटी सदृश्य असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई उपनगरातील व पालिका हद्दीतील शाळा, महाविद्यालयांना पहिल्या सत्रात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर पावसाचा जोर पाहून पुढील सत्रांसाठीचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे. तर कामाला जाणाऱ्या नागरिकांना आज घराबाहेर पडू नये, अश्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्यांना वर्क फ्रॉम होम शक्य आहे. त्यांनी घरूनच काम करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment