Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, July 22, 2024

ऑक्सीजन पार्क निर्मितीची सुरुवात; जिल्हा न्यायाधीश यांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

ऑक्सीजन पार्क निर्मितीची सुरुवात;

 जिल्हा न्यायाधीश यांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न.. 

सोलापूर (प्रतिनिधी) :- संगमेश्वर महाविद्यालय व इको नेचर क्लब संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर सुचनेनुसार वृक्ष लागवड सुरूवात करण्यात आली आहे.

जिल्हा न्यायाधीश मा.सलमान आझमी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव मा.उमेशजी देवर्षी साहेब व सहाय्यक लोकअभिरक्षक देवयानी किणगी यांच्या  सहयोगाने न्यायाधीश निवास परिसर मधील २ एकर परिसरात ऑक्सीजन पार्क निर्मिती होत आहे. इको नेचर क्लबच्या माध्यमातून औषधी वनस्पती उपलब्ध करून देण्यात आले. संगमेश्वर महाविद्यालयतील विद्यार्थीनी श्रमदान करून या उपक्रमात सहभाग नोंदवला.




 जिल्हा न्यायाधीश श्री योगेश राणे व न्यायाधीश श्री पाटील यांच्या उपस्थित वृक्षारोपण करण्यात आले. उपस्थित संगमेश्वर महाविद्यालय  प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी वर्ग प्रा शिवाई शेळके यांच्या नियोजनात विद्यार्थी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदर्श धडे, सुरेश कसबे तसेच ऑक्सिजन पार्क साठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची टीम श्रमदान करित आहे. तेथील सुरक्षा बल वृक्षांना पाणी घालण्याची जबाबदारी घेतली आहे. इको नेचर क्लब चे मुख्य प्रवर्तक वसुंधरा अभियानचे पर्यावरणदुत  मनोज देवकर यांनी वृक्षारोपण कृतीशीलता ,पर्यावरण प्रबोधन संवाद साधला व मुलांना कशा पद्धतीने वृक्षलागवड वृक्ष संवर्धन करावे याची माहिती दिली. वृक्ष लागवड मध्ये सामाजिक वनीकरण वन विभाग यांचे ही मार्गदर्शन आहे.विविध देशी  वृक्ष लागवड करत आहे १०० वृक्ष सेवा करण्यात आले 

    माझी वसुंधरा अभियानास प्रतिसाद देत कंपोस्ट खत निर्मिती यासाठी ४ बाय ४ चा खड्डा करून त्यात पाला पाचोळा टाकुन वृक्ष साठी सेंद्रिय खत निर्मिती ही तयार होत आहे. विद्यार्थी यांच्या सहकार्याने हे पुर्ण होत आहे.अशी माहिती मनोज देवकर यांनी दिली.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment