सारा न्यूज नेटवर्क -
धक्कादायक ! जुळे सोलापुरात युवकाच्या डोक्यात दगड घालून खून..
सोलापूर(प्रतिनिधी) :- जुळे सोलापूरातील कल्याण नगर भागात एका तरुणाचा खून झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी आले असून पंचनामा करीत आहेत. रविवारी मध्यरात्रीच्या दरम्यान खून झाल्याचे बोलले जात आहे. अविनाश हुक्के वय साधारण 25, कल्याण नगर भाग एक असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
कल्याण नगर भागातील बँक ऑफ इंडियाच्या मैदानात ही घटना घडली आहे. डोक्यात दगड घालून खून झाल्याचे प्राथमिक माहितीवरून दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त परमार तसेच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड हे आपल्या कर्मचाऱ्यांसह दाखल झाले असून पोलिसांकडून पंचनामा केला जात आहे. युवकाची आजी येऊन तिच्याकडून ओळख पटली असून लादेन यांची ॲम्बुलन्स बोलवण्यात आली आहे. नागरिकांकडून माहिती घेतली असता बँक ऑफ इंडियाच्या मैदानात बरेच युवक रात्री दारू पित बसतात, रात्री नागरिक जातात येतात, महिलांची छेडछाड होत असल्याच्या तक्रारी आहेत. दारू पिऊन झालेल्या वादातूनच हा खून झाल्याचे बोलले जात आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment