सारा न्यूज नेटवर्क -
"मोहरम इस्लामिक नववर्ष" निमित्ताने, तसेच यादे हुसेन रजी इनकी यादमे,
भव्य रक्तदान व आरोग्य शिबीराचे आयोजन..
सोलापूर (प्रतिनिधी) : - पंजाब तालीम युवक मंडळ सोलापूर यांच्या कडून " मोहरम इस्लामिक नववर्ष!" निमित्ताने तसेच यादे हुसेन रजी इनकी यादमे भव्य रक्तदान व आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
हे शिबीर शनिवार 6 जुलै आणि 7 जुलै रोजी सकाळी 10 ते 3 या दरम्यान पंजाब तालीम येथील २ नंबर शाळा मस्जिद समोर सोलापूर येथे घेण्यात आले,
या रक्तदान शिबिराचे नियोजन "सिध्देश्र्वर ब्लड बँक" यांच्या मार्फत करण्यात आले, या शिबिरास परिसरातील नागरिकांनी व युवकांनी भरपूर प्रतिसाद देत उत्स्फूर्तपणे रक्तदान केले, या शिबिराच्या माध्यमातून एकूण 135 बाॅटल रक्त संकलन झाले.
या रक्तदान शिबिर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून महेश कोठे, हाजी फारुक शाब्दी, तौफिक पैलवान, नाना काळे, संतोष पवार , प्रथमेश कोठे, जुबेर बागवान, अमोल शिंदे, मनोज गादेकर, श्रीकांत घाडगे, सुधीर थोबडे, मतीन बागवान, प्रताप चौहान, राम हुंडारे आदी मान्यवर उपस्थित होते.
आरोग्य शिबीराचे आयोजन -
या आरोग्य शिबीराचे नियोजन "छत्रपती शिवाजी महाराज सर्वोउपचार रुग्णालय" सोलापूर यांच्या मार्फत करण्यात आले.
शनिवार 6 जुलै रोजी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डोळे, कान नाक घसा, जनरल ओपीडी, बीपी शुगर अशा विविध आजाराचे तज्ञ डॉक्टर हजर होते.
सकाळ पासुनच परिसरातील नागरिकांनी या आरोग्य शिबीरात सहभागी होऊन स्वतः डॉक्टरांकडून तपासणी करून औषध उपचार करून घेतले.
यावेळी खालील डॉक्टर व स्टाफ यांनी सहभाग घेतला.
डॉ.विनय MP(जनरल मेडिसिन), डॉ. नीरज मेश्राम(Ped.विभाग), डॉ. सतीश सुरवसे (जनरल सर्जरी), रोहन सोमाणी (नेत्रचिकित्सा), आनंद जव्हाळ (Mcco आरोग्य शिबिर), विकास माळवदकर (आरोग्य मित्र), सिमरन शेख (फार्मासिस्ट), स्वप्नील ठाकरे, नरसिंग विल्हाल मामा, इब्राहिम बागवान.
या शिबिरात सर्व नागरिकांना मोफत उपचार व औषधे वाटप करण्यात आले. या शिबिरात एकूण 130 नागरिकांची तपासणी करण्यात आली.
पंजाब तालिम सदर जाविद शेख, नायब सदर, राजु हुंडेकरी, शेरू मैनु नायकवडी, उस्ताद बब्बु शेख, एजाज हुंडेकरी, मुजाहिद सय्यद, इफ्तेकार शेख, नवाज हुंडेकरी, तौसिफ शेख, मैनु पटेल, निजाम सरकार, हैदर शेख, वाजिद शेख, मुजाहिद शेख, फयाज हुंडेकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी परिसरातील युवकांनी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment