Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, July 21, 2024

महाराष्ट्रातील चर्मकार समाजाच्या प्रलंबित मागण्या बाबत हवाई वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री मा.मुरलीधर मोहोळ यांच्याशी दत्ताभाऊ कदम यांनी साधला संवाद ;

 


सारा न्यूज नेटवर्क -

महाराष्ट्रातील चर्मकार समाजाच्या प्रलंबित मागण्या बाबत हवाई वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री मा.मुरलीधर मोहोळ यांच्याशी दत्ताभाऊ कदम यांनी साधला संवाद ;

 संत रविदास महाराज यांची प्रतिमा दिली भेट..

पुणे (प्रतिनिधी) :- पुण्य नगरीचे नवनिर्वाचित खासदार हवाई वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री मा.मुरलीधर मोहोळ आज पुण्याचे माजी उपमहापौर डॉ सिध्दार्थ धेंडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

यावेळी संत रविदास चर्मकार युवा महासंघ फौंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय आत्माराम कदम यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी महाराष्ट्र राज्यातील चर्मकार समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या बाबत हवाई वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री मा.मुरलीधर मोहोळ यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यांनी त्या सर्व मागण्या बाबत पाठपुरावा करू असा सकारात्मक प्रतिसाद दिला.

या सदिच्छा भेटी दरम्यान संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय कदम यांच्या हस्ते हवाई वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री मा.मुरलीधर मोहोळ यांना संत रविदास महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली. 

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment