सारा न्यूज नेटवर्क -
अधीक्षक अभियंता पदाचा सुनील मानेंनी घेतला पदभार;
विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन च्या वतीने सत्कार..
सोलापूर(प्रतिनिधी) : - महावितरण सोलापूर मंडलाच्या अधीक्षक अभियंतापदी सुनील माने यांनी नुकताच पदभार घेतला. पदभार घेताच पंढरपूरच्या आषाढी वारीच्या अनुषंगाने नियोजनाला सुरुवात केली आहे. वारकऱ्यांची सुरक्षा, करण्यात आलेल्या उपाययोजना व तयारीचा आढावा घेत विविध सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
महावितरण प्रशासनातर्फे नुकत्याच झालेल्या बदली व पदोन्नती प्रक्रियेतून बारामती परिमंडलास चार नूतन अधीक्षक अभियंता मिळाले असून परिमंडलाचा अधीक्षक अभियंता पदाचा कोरम पूर्ण झाला आहे. सोलापूर मंडल अधीक्षक अभियंतापदी भांडुप शहर परिमंडलात कार्यकारी अभियंतापदी असलेले सुनील माने यांची पदोन्नतीवर सोलापूर अधीक्षक अभियंतापदी वर्णी लागली. माने यांनी सोमवारी सकाळी पदभार स्वीकारला.
विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन च्या वतीने सत्कार..
सुनील माने यांना पदोन्नती मिळाल्याने विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन (१०२९) च्यावतीने स्वागत-सत्कार करून, पुढील कारकिर्दीस शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी बारामती परिमंडळ अध्यक्ष तानाजी चटके, सोलापूर मंडळ अध्यक्ष सुनील काळे, उत्तरेश्वर स्वामी, हणमंत जाधव, बशीर तांबोळी, शुकुर शेख, अजिम चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment