सारा न्यूज नेटवर्क -
परभणी जिल्हा प्रशासना तर्फे सोलापूर चे गायक मोहंम्मद अयाज यांचा सन्मान..
परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व मोहंम्मद अयाज यांनी जय जय महाराष्ट्र माझा तसेच चलते चलते मेरे ये गीत याद रखना ही गीते सादर केली..
परभणी (प्रतिनिधी) :- नुकतेच सोलापूरचे गायक तथा महागायक विजेते मोहम्मद अयाज यांचा परभणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मोहम्मद अयाज यांचा गौरव करण्यात आला. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी १७ - परभणी लोकसभा मतदारसंघ तर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व मोहंम्मद अयाज यांनी जय जय महाराष्ट्र माझा तसेच चलते चलते मेरे ये गीत याद रखना ही गीते सादर केली.
या कार्यक्रमात कार्य गौरव सोहळा तसेच मोहम्मद अयाज प्रस्तुत स्वर गंध संगीत संध्या चे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात मोहम्मद अयाज आणी सहकारी निरनिराळे गीत सादर करुन प्रशासनाला भारावून टाकले . निसर्गाच्या सानिध्यात बाहेर पाऊस झडी होती तर आत मोहम्मद अयाज रिमझिम के गीत गात जणु काही संगीत ताल - सुरांची सुरीली उधळनच अनुभवायला मीळाली.
या वेळी परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते मोहम्मद अयाज यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी परभणी चे पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी. अपर जिल्हाधिकारी प्रताप काळे. उपजिल्हाधिकारी जीवराज डापकर. उपजिल्हाधिकारी संगीता सानप.उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते . उपजिल्हाधिकारी शैलेश लाहोटी. दत्तू शेवाळे. अपर पोलीस अधीक्षक काळे सह सेकडो अधिकारी वर्ग उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment