सारा न्यूज नेटवर्क -
दरोड्याच्या प्रयत्नात असलेली अंतरराज्य टोळी जेरबंद;
विजापूर नाका गुन्हे प्रकटीकरण पथकाची दमदार कामगिरी..
सोलापूर (प्रतिनिधी) :- यात हकीकत अशी कि, विजापुर नाका पोलीस ठाणे कडील पोशि/अमृत सुरवसे व पोशि/सिध्देश्वर स्वामी असे दोघे पोलीस स्टेशन हद्दीत रात्रगस्त दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना दि. १०/०७/२०२४ रोजी पहाटे ०४/४५ वा. च्या सुमारास कर्नाटक पासिंग असलेल्या दोन चारचाकी गाड्या एका मागो माग वेगाने सोरेगावच्या रस्त्याने येत असताना दिसुन आल्याने सदर दोन्ही चारचाकी गाड्यास टिकेकर वाडी रेल्वे ब्रीजचा बोगद्या जवळ आडवुन सदर दोन्ही गाड्याची पाहणी केली असता, त्यात दरोड्यास लागणारे साहित्य दिसुन आल्याने वरील दोन्ही पोलीस अमंलदार यांनी घरफोडीच्या अनुशंगाने रात्रगस्त करिता असलेले सपोनि/गायकवाड, पोहेकॉ/गणेश शिर्के व पोशि/संतोष माने यांना सदर ठिकाणी बोलावून घेतले व त्यानंतर सदर संशियत ८ इसमाना लागली ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १) कनकमुर्ती ज्ञानदेव गोंधळी रा गांधी नगर, स्टार चौक विजयापुर २) संजय मल्लप्पा पुजारी रा- मु.पो. चिक्करुगी ता देवर हिप्परगी जिल्हा विजयापुर ३) समीर मक्तुमसाब कोलार रा-मु.पो. चिक्करुगी ता- देवरहिप्परगी जिल्हा विजयापुर ४) अभिषेक देवनांद बिरादर रा मु.पो. चिक्करुगी ता- देवरहिप्परगी जिल्हा विजयापुर ५) लिंगय्या हिरय्या हिरेमठ रा-मु.पो. चिक्करुगी ता- देवरहिप्परगी जिल्हा विजयापुर ६) प्रविण मोनाप्पा बडीगेर रा-मु.पो. चिक्करुगी ता देवरहिप्परगी जिल्हा- विजयापुर ७) आकाश बसवराज भासगी रा- मु.पो. सुरगीहळ्ळी ता- सिंदगी जिल्हा विजयापुर ८) रमेश महादेवप्पा सालोडगी सर्व रा. कर्नाटकर त्या अंतरराज्य टोळीतील टोळी प्रमुख कनकमुर्ती इ गानदेव गोंधळी रा गांधी नगर, स्टार चौक विजयापुर यास विश्वासात घेवुन चौकशी केली असता सांगितले की, " आम्ही सर्वजन मिळुन कुंभारी येथे जाऊन आमच्या ओळखीचा हबीब सरदार पठाण रा. इंदिरा नगर, कुंभारी याच्या मदतीने कुंभारी येथील अश्विनी हॉस्पीटल येथे दरोडा टाकण्यासाठी जात होतो असे सांगीतल्याने त्यांच्या ताब्यातुन दरोड्यास लागणारे १) एक लोखंडी कटर, २) एक लाल रंगाची घरगुती गॅस टाकी, ३) एक ऑक्सिजन गॅस टाकी, ४) रबरी पाईपसह प्रेशर रेग्युलेटर गॅस कटर, ५) एक लोखंडी कटावणी, ६) एक लोखंडी पाना, ७) एक अॅगजेस्टेबल पाना, ८) चार नवीन काळ्या रंगाचे टि-शर्ट, ९) एक जुना काळा टि-शर्ट १०) ४ तोंडाचे काळे मास्क, ११) ९ जोड रबरी पांढ-या रंगाचे हॅन्ड ग्लोज, १२) एक काळ्या रंगाचा स्कार्फ, १३) एक निळ्या रंगाचा सॅक त्यामध्ये प्लॅस्टीकचे दोन धान्याचे रिकामी पोते १४) एक दुचाकी १५) २ चारचाकी गाड्या १६) ९ नग विविध कंपनीचे मोबाईल असे एकुण २३,६६,८५०/- मुद्देमाल जप्त केला.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. एम. राजकुमार साो, पोलीस उप आयुक्त (परीमंडळ) श्री विजय कबाडे साो, सहा. पोलीस आयुक्त वि-२ श्री यशवंत गवारी साो, वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री दादा गायकवाड साो, पोनि श्रीमती संगिता पाटील साो (गुन्हे) व गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सपोनि/गायकवाड, पोहेकों/सचिन हार, शंकर भिसे, गणेश शिर्के, पोना/हुसेन शेख, पोकों/संतोष माने, श्रीनिवास बोल्ली, अमृत सुरवसे, समाधान मारकड, सद्दाम आबादीराजे, राहुल सुरवसे, स्वप्निल जाधव, रमेश कोर्सेगाव, सिध्देश्वर स्वामी यांनी पार पाडली.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment