सारा न्यूज नेटवर्क -
100 जन्मठेप , 100 सामाजिक उपक्रमाची मालिका;
जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांच्या संकल्पनेतून आजचा उपक्रम क्रमांक ६..
सोलापूर (प्रतिनिधी) :-100 जन्मठेप पूर्णत्वास, 100 सामाजिक उपक्रमाची मालिका. या कार्यक्रमाचे अंतर्गत विशेष जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांच्या संकल्पनेतून आजचा उपक्रम क्रमांक ६ घेण्यात आला.
शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय येथील ३६ एकर परिसरात शंभर वृक्षांची लागवड करण्यात आले.
इको नेचर क्लब व जिल्हा सरकारी वकील मा.श्री प्रदीपसिंग राजपूत मित्रपरिवार व शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय यांच्या आयोजनाने महाविद्यालयातील 36 एकर परिसरामध्ये हा दुसरा टप्पा 100 वृक्ष लागवडीने पूर्ण केला .DGP Adv Pradipsing Rajput sir यांच्या मार्गदर्शनखाली व इकोनेचर क्लबचे मुख्य प्रवर्तक व पर्यावरण दूत डॉ मनोज देवकर व सहाय्यक लोक अभिरक्षकॲड.देवयानी किणगी तसेच प्राध्यापक शिवलीला ख्याडे यांच्या पुढाकाराने व प्रमुख उपस्थिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक उपाध्याय उपप्राचार्य डॉ प्रशांत किल्लेदार यांच्या उपस्थित सर्व प्राध्यापक वर्ग कर्मचारी वर्ग विद्यार्थी वर्ग व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करण्यात आले 100 वृक्षांची लागवड करून शंभर ठिकाणी 100 असे एक लाख वृक्ष वर्षभरात लागवड करण्याचा संकल्प इको नेचर क्लबच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे त्याला सर्वांनी प्रतिसाद देत वृक्षारोपणास प्रारंभ झाला आहे.
महाविद्यालयाच्या व आयोजकांच्या माध्यमातून आलेल्या प्रमुख अतिथी जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांचे विशेष सन्मान ही करण्यात आला .तसेच सूत्रसंचालन प्राध्यापक शिवलीला खेडे मॅडम यांनी केले इको नेचर क्लबच्या माध्यमातून रोपे उपलब्ध करण्यात आले तसेच या परिसरामध्ये पुढे घनवन करण्याची सुरुवात झालेली आहे त्यामध्ये सामाजिक वनीकरण, वन विभाग, माझी वसुंधरा अभियान यांचेही सहकार्य लाभत आहे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी यांनी संवर्धनाचे जबाबदारी घेतली आहे
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment