सारा न्यूज नेटवर्क -
वीज मंडळ तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार..
सुनिल काळे यांची पतसंस्थेच्या "कोषाध्यक्ष" पदी निवड..
सोलापूर (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र वीज मंडळ तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित, सोलापूर. पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. सन २०२३-२४ ते २०२८-२९ या पंचवार्षिक कालावधी करीता नूतन संचालकांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच नूतन संचालकांमधून पदाधिकारी यांची निवड करण्यात आली. नूतन संचालक तथा विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे सोलापूर मंडळ अध्यक्ष श्री. सुनिल काळे यांची पतसंस्थेच्या "कोषाध्यक्ष" पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
यानिमित्ताने अपरिचित सामाजिक संस्था, सोलापूर संस्थापक/अध्यक्ष श्री. मयुर गवते व महावितरण औद्योगिक वसाहत कार्यालयातील सहकारी जनमित्र व यंत्रचालक यांच्या वतीने "कोषाध्यक्ष" श्री. सुनिल काळे यांचे अभिनंदन व सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.
याप्रसंगी श्री. मयुर गवते, धुळप्पा टेळे, निलकंठ कांबळे, गुंडप्पा बनसोडे, नितीन कोळी, अपेक्षा बहादुरे मॅडम, हिना बागवान मॅडम आदी उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment