सारा न्यूज नेटवर्क -
*कामती खुर्द येथे शेतकर्याच्या दारात आढळला आजारी लांडगा,
शेतकर्यांनी भूतदया दाखवत आजारी लांडग्यास दिली जगण्याची संधी.
तातडीने उपचारासाठी लांडग्याची वनविगाकडून पूण्याला रवानगी.
जी आय बी फाउंडेशन व वविभागाची यशस्वी बचाव मोहीम*
सोलापूर (प्रतिनिधी) दि. 6 जुलै :- येथील मोहोळ तालुक्यामधील कामती खुर्द येथे कुणाल आणि गौरव दावणे आपल्या कुटुंबासह आपल्या शेतातील घरात राहतात.
नेहमीप्रमाणे दावणे कुटुंबातील सदस्य आपल्या दिनचर्येत व्यस्त होते. दुपारी दोनच्या सुमारास घरातील लहान मुलाला शौचास जाताना दारात एक अनोळखी कुत्रा झोपलेला दिसला. मुलाने आपल्या वडीलांना वरील बाब सांगीतली. अनोळखी कुत्रा कुणाला तरी चावेल म्हणून श्री कुणाल दानवे यांनी जवळ जाऊन पाहिले तर तो शौचालयाच्या पायरीवर बसलेला प्राणी कुत्रा नसुन जंगली लांडगा असल्याचे दिसून आले. लांडगा जास्त हालचाल करत नसल्याने तो आजारी असुन त्याला उपचार मिळावा या उद्देशाने श्री दावणे यांनी सोलापूर येथील जी आय बी फाऊंडेशन चे सचीव राजकुमार कोळी यांना लांडग्याला वाचवण्यासाठी बोलावले.
माहिती मिळताच घटनेचे गांभीर्य ओळखून सोलापूर वन विभागाची वन्यजीव बचाव टीम तत्काळ घटनास्थळी संपुर्ण यंत्रणेसह दाखल झाली. अत्यावस्थेतील लांडगा सुरक्षीतपणे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या ताब्यात घेतला. सदरचे बचाव कार्य उपवनसंरक्षक वनविभाग प्रादेशिक सोलापूर यांच्या मार्गदर्शना खाली, सहा.वन संरक्षक यांच्या नियंत्रणात, वनपरिक्षेत्र अधिकारी सोलापूर व मोहोळ परीक्षेत्र यांनी जी आय बी फाउंडेशन च्या संयुक्तमोहीमेतुन यशस्वी करण्यात आले.
मोहिमेचे नेतृत्व वनपरिक्षेत्र सोलापूरचे वनपाल श्री शंकर कुताटे, वनरक्षक श्रीशैल पाटील, सोनटक्के मॅडम, श्री विभुते यांनी केले तर वन्यजीव बचाव दलाचे सदस्य प्रविण जेऊरे, श्री लक्ष्मण निरवणे, जी आय बी फाउंडेशन चे अध्यक्ष श्री पंकज चिंदरकर, सचिव श्री राजकुमार कोळी, यांनी बचाव कार्यात सहभाग घेतला.
आजारपणाने कमकुवत होऊन अत्यावस्त अवस्थेत भरकटून लांडगा वस्तीवर आला असण्याची शक्यता आहे.त्याला योग्य उपचार आणि देखभालीची तातडीने आवश्यकता होती.
विहीर रितीने प्राथमीक तपासणी करुन पुढील उपचारासाठी लांडगा पुणे येथील वन्यजीव उपचार केंद्रात तातडीने हलवण्यात आला आहे. दावणे कुटुंबीयांनी न घाबरता मुक्या जिवाला वाचवण्यासाठी दाखवलेली भूतदया व प्रसंगावधान यांचे वनविभाग आणि पर्यावरण प्रेमींकडू कौतुक होत आहे.
*भारतीय लांडगा Indian grey wolf (canis lupus pallipes) हा भारतीय उपखंडातील उघड्या माळरानावर आढळणारा कणाधारी, श्वान कुळातील मांस भक्षक सस्तन प्राणी आहे. लांडगा मैदानी प्रदेशातील सर्वोच्च शिकारी प्राणी आहे त्यामुळे तो माळावरचा वाघ म्हणून ओळखला जातो.*
काळवीट, ससे, यांची तो प्रामुख्याने शिकार करतो. वेळ प्रसंगी उंदीर, सरडे मारुन तर कधी बोरे आणि माळावर चे कीटक देखील खाऊन तो आपली भूक भागवतो.
माळरानाचा र्हास, नैसर्गिक शिकारीची कमतरता, शिकार क्षेत्रात व प्रजनन क्षेत्रात मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण झालेले अडथळे, अंधश्रद्धा यामुळे भारतातील लांडग्याची संख्या अत्यंत झपाट्याने कमी होत आहे.
2022 च्या भारतीय वन्यजीव अनुसंधान (WII) या संस्थेच्या अहवालानुसार भारतातील लांडग्यांनी संख्या 3100 इतकी अनुमानीत करण्यात आली आहे. 2023 WII च्या अहवालातील भारतातील वाघांच्या 3652 संखेची लांडग्यांच्या संखेशी तुलना केल्यास भारतीय लांडग्याची संख्या वाघांच्या संख्येपेक्षाही कमी असल्याचे आपल्याला लक्षात येईल. याच कारणाने *आय यू सी एन च्या रेड डाटा लीस्ट मधे लांडगा हा प्राणी लुप्तप्राय प्रजाती (Endangered species 3.1) च्या यादीत समाविष्ट आहे.* जी पृथ्वी वरील अस्तित्व धोक्यात असलेल्या प्रजातीच्या गटात मोडते. म्हणून *लांडगा प्रजाती वाचवण्यासाठी लांडगा संवर्धन प्रकल्प सुरू करण्याची आवश्यकता आहे.*
*भारतात वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अत्यंत संरक्षीत प्रजाती म्हणून त्यांचा समावेश अनुसूची 1 मधे समावेश आहे.* या प्रजातीच्या शिकार, अवैध व्यापार आणि तस्करीस भारतीय वनकायद्यात प्रतीबंध करण्यात आला आहे. वरील *कायद्याचा भंग झाल्यास आरोपीस कारावास आणि मोठा आर्थिक दंड करण्याची तरतुद कायद्याने करण्यात आली आहे.*
लांडग्यासमोर असलेलया अनेक संकटांमुळे जगण्यासाठी तो त्यांची पारंपारिक शिकार सोडून कधीकधी शेळ्या, मेंढ्या, लहान वासरे अशी पाळीव प्राणी मारुन देखील आपली भूक भागवतो. असे असले तरी वनविभागाकडून योग्य शहानिशा करून *वन्यजीवांकडुन झालेल्या शिकारी पोटी जनावरांच्या मालकांना विहीत रितीने नुकसान भरपाई दिली जाते.* अत्यंत दुर्मिळ प्रसंगी पिसाळलेला,किंवा पिले असलेल्या लांडग्यांच्या माद्या माणसावर ही हल्ला करुन चावा घेउ शकतात.परंतु शिकार करुन मांस भक्षण करण्याच्या उद्देशाने लांडगा कधिही माणसावर हल्ला करत नाही. *जंगली श्वापदांकडून माणसावर हल्ला होउन मृत्यू घडून आला किंवा व्यक्ती जखमी झाल्यास तातडीने विहित रितीने नुकसान भरपाई वनविभागाकडून संबंधित व्यक्ती किंवा त्यांच्या कुटुंबीयांना दिली जाते.*
आपल्या परिसरात वन्यजीवांचा हल्ला, अवैध शिकारीच्या घटना, वन्यजीवांचा मानवि वस्तीतील धोकादायक वावर अशा घटनांची माहिती तत्काळ *1926* या टोल फ्री क्रमांकावर आपण देऊ शकतो.
*पर्यावरण आणि जैवविविधता संरक्षण संवर्धनाच्या मोहीमेत आपण जी आय बी फाउंडेशन संस्थेशी बरोबर सहभागी होऊ शकता. अधिक माहिती व मदतीसाठी आपण 7083460066 व 9850778164 या क्रमांकावर संपर्क साधावा.*
असे आवाहन जी आय बी फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment