सारा न्यूज नेटवर्क -
"राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशनचा आषाढीचा भक्तिमय सोहळा"
सोलापूर (प्रतिनिधी) :- रविवार दिनांक 14 जुलै 2024 रोजी आषाढी एकादशी निमित्ताने ब्रिजधाम आश्रम सोरेगाव या ठिकाणी "राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशन सोलापूर" यांनी आयोजित केलेला "कानडा राजा पंढरीचा" हा कार्यक्रम भक्तीपूर्ण वातावरणात आनंदाने पार पडला.. वयस्कर आजी आजोबा पंढरपूरला जाऊ शकतीलच असे नाही हा विचार करून विठोबाला घेऊनच ब्रिजधाम वृद्धाश्रम या ठिकाणी विठोबाला घेऊन जाऊन आषाढी एकादशीचा कार्यक्रम पार पाडला.
कार्यक्रमाची सुरुवात दिंडीने करण्यात आली.. या दिंडीमध्ये बालकलाकार चि. श्लोक केकडे (विठ्ठल), कुमारी मृणाल जवळगेकर(रुक्मिणी), वेद केकडे (नामदेव), ओवी कुलकर्णी (मुक्ताई), आरव दुरुगकर(तुकाराम) गहिनीनाथ वीर (वारकरी) हे संतांच्या मुख्य भूमिकेमध्ये होते. संस्थेच्या अध्यक्षा सौ प्रांजली मोहीकर यांनी सर्व भाविकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत महाराष्ट्रातील संत परंपरेवर प्रकाश टाकला. ब्रिजधाम आश्रम चे अध्यक्ष माननीय श्री ब्रिजमोहन फोफलिया शेठजी हे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, या फाउंडेशनने राष्ट्ररत्न हे नाव अतिशय योग्य ठेवले आहे.. सर्व संत ब्रिजधाम आश्रम मध्ये आल्यामुळे प्रत्यक्ष परमेश्वराचा वास या ठिकाणी आहे असे त्यांनी सांगितले..
विठ्ठलाच्या मूर्तीचे पूजन करून आरती करण्यात आली.. सर्व उपस्थित भाविकांसोबत सुंदर पद्धतीने रिंगण सोहळा सादरीकरण झाले..या कार्यक्रमात कुमारी गौरी बडदाळे, सिद्धार्थ भडकुंबे, शैलेश मोहीकर यांनी भक्ती गीते सादर करून वातावरण भक्तिमय केले .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुरेश खमीतकर यांनी केले.
सर्व बालकलाकार तसेच भक्ती गीते सादर करणाऱ्या गायकांना राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशन तर्फे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष श्री प्रेमचंद मेने, सौ ज्योती मेने, चि. वेदांत मोहीकर, चि. अनिश मोहीकर, निकम ताई, बाहुबली दुरुगकर, सुहास भोसले, राजेश केकडे बालाजी पाठक,अपर्णा पाठक तसेच मोठ्या संख्येने भाविक आणि वारकरी उपस्थित होते.. कार्यक्रमाचे आभार सौ ज्योती मेने यांनी केले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment