Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, July 3, 2024

पत्रकार सैफन शेख हल्ला बाबत पत्रकार सुरक्षा समितीची डीन कडे सीसीटीव्ही फुटेज मागणी.

 


सारा न्यूज नेटवर्क - 

पत्रकार सैफन शेख हल्ला बाबत पत्रकार सुरक्षा समितीची डीन कडे सीसीटीव्ही फुटेज मागणी. 

सोलापूर (प्रतिनिधी ):-  येथील एमडीन्यूज चे संपादक तथा जेष्ठ पत्रकार सैफन शेख यांनी जिल्हाशल्य चिकित्सक व सोलापूर महानगरपालीका आरोग्य अधिकारी यांच्या नियुक्ती बाबत सातत्याने बातम्या प्रसारित केल्या होत्या. त्या बातमी चा राग मनात धरून जेष्ठ पत्रकार सैफन शेख यांच्यावर दिनांक 28/6/2024 रोजी सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटल परिसरात श्रीकांत गायकवाड या व्यक्तीने हल्ला केला तसेच जबर मारहाण केली अशी तक्रार सदरबझार पोलीस ठाण्यात दिली असून सदर चा हल्ला जिल्हा शल्य चिकित्सक व आरोग्य अधिकारी सोलापूर महानगर पालिका यांच्या सांगण्यावरून करण्यात आला असल्याचा आरोप जेष्ठ पत्रकार सैफन शेख यांनी केला असून. सदर हल्ला प्रकरणी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज सर्वउपचार रुग्णालयाचे अधिष्ठता यांच्याकडे दिनांक 1 / 7/ 2024 रोजी लेखी पत्र देऊन जेष्ठ पत्रकार सैफन शेख यांच्यावर झालेल्या हल्ला बाबत सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ची मागणी केली आहे.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे



No comments:

Post a Comment