Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, July 27, 2024

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण" योजनेअंतर्गत गुरववाडी येथे मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

"मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण" योजनेअंतर्गत गुरववाडी येथे मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.. 

अक्कलकोट (प्रतिनिधी):- अक्कलकोट तालुक्यातील गुरववाडी येथे नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेच्या मोफत फॉर्म भरून ऑनलाईन तसेच ऑफलाइन भरून देण्याचा प्रशिक्षणाचा शुभारंभ गुरववाडी ता.अक्कलकोट येथील ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. 

 हा कार्यक्रम दिनांक २६.७.२०२४ रोजी जनजागृती करण्यासाठी सर्व गावातील महिला मंडळांना ग्रामपंचायती कार्यालयामध्ये सरपंच सौ लक्ष्मी माळप्पा पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली चावडी वाचन व शासनाची योजनेची माहिती देण्यासाठी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.


यावेळेस महिलांना मोफत ऑफलाईन व ऑनलाईन फॉर्म भरून घेण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे, यावेळी महायुती सरकारच्या या उपक्रमाचं स्वागत करण्यात आले.

महिलांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण होते. लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक महिलांना पंधराशे रुपये देण्याची योजना या शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी व महिला वर्गाचा त्रास कमी करण्यासाठी हा उपक्रम राबवीत असल्याचे गावचे सरपंच माळप्पा पुजारी यांनी सांगितले. 

यावेळी  कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती गुरववाडीचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री माळाप्पा पुजारी, जगदेवी स्वामीउपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य सारिका ओंकारी, बसवराज देवरमनी, बचत गटाचे महिलाअध्यक्ष अनिता मोती, ज्योती कोळी, सुखदेवी बहादुरे ,विजयलक्ष्मी औराद, अनेक इत्यादी महिला मंडळ उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment