सारा न्यूज नेटवर्क -
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृती दिनानिमित्त हेडक्वॉर्टर शाळेत वृक्षारोपण...
सोलापूर (प्रतिनिधी) :- दिनांक-18 जुलै 2024 रोजी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्मृतिदिनानिमित्त मनपा मराठी मुलांची केंद्रशाळा हेडक्वॉर्टर येथे "क्रांतीसुर्य प्रतिष्ठान" च्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री आदर्श धडे यांच्या पुढाकाराने सदरील वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करून समाजापुढे आदर्श निर्माण केला.
या कार्यक्रमाप्रसंगी मा. मिनाक्षीताई पेठे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी या अध्यक्षस्थानी होत्या. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार सुरक्षा समितीचे शहर अध्यक्ष राम हुंडारे, मुन्नाभाई शेख, सुरेश कसबे,शशिकांत उकरंडे,सुनील रणदिवे, बुवाजी वावडे,नंदकिशोर दिडवाने,डॉ.मनोज देवकर, अजय धडे,नितीन बनसोडे, अंबादास भवाळे,पांडुरंग अडसुळे, दयानंद गायगवळी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सविता जाधव, सूत्रसंचालन सोमनाथ सोनलकर आभार प्रदर्शन शिरीन शेख यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहशिक्षिका प्रांजली तरंगे,राजश्री पतंगे यांचे सहकार्य लाभले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment