सारा न्यूज नेटवर्क -
जिल्हा परिषद च्या उर्दू शाळांमध्ये इतर माध्यमांच्या शिक्षकांची नियुक्ती तात्काळ रद्द करा. सादिक शेख यांची शासनाकडे मागणी..
सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर जिल्ह्यात सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषदेतील विविध शाळांमध्ये इतर माध्यमांच्या शिक्षकांची नियुक्ती केली जात आहे. सदरहू शाळेत सर्व विद्यार्थ्यांची मातृभाषा व शाळेत शिकवण्यात येणारे माध्यम उर्दू असून येणाऱ्या शिक्षकांची मातृभाषा उर्दु नसुन इतर माध्यमांची असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण देताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. एखाद्या शाळेत विषय शिक्षक म्हणून जास्तीत जास्त दोनच शिक्षक असतात व त्यात इतर माध्यमाचा 1 शिक्षक आला तर तो शिक्षक उर्दु, गणित, विज्ञान, इतिहास, भुगोल, नागरिकशास्त्र हे विषय कुठल्या माध्यमात शिकवणार असा प्रश्न उपस्थित होत आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे. जर इतर माध्यमाचा शिक्षक शाळेवर हजर झाला तर त्यांना हजर करून घेणार नसल्याचे सर्व जि.प.शाळांची व्यवस्थापन समितीने ठराव केलेला आहे. जर हे शिक्षक रुजू झाले तर संबंधित पालकांनी विद्यार्थी विद्यार्थीनींना शाळेतून काढून घेण्याचा इशारा दिलेला आहे. सदर शिक्षकांना कोणत्याही शाळेवर नियुक्ती देऊन त्यांना शाळेत पाठविण्यात येऊ नये.
सदर इतर माध्यमातील शिक्षकांची नियुक्ती जि.प. च्या अंतर्गत यणाऱ्या उर्दू शाळेत करण्यात येऊ नये कारण विद्यार्थ्यांचे खुप मोठे शैक्षणिक नुकसान होण्यास आपणच जबाबर राहतील. व विद्यार्थ्यांचा शैक्षणिक वर्ष वाया घालवण्यास देखील आपणच जबाबदार राहतील. त्यासाठी तात्काळ जातीने स्वतः लक्ष घालून त्यावर योग्यतो विचार करून त्वरित निर्णय घ्यावा.
म्हणून अल्पसंख्याक समाज विकास मंच चे संस्थापक अध्यक्ष सादिक शेख यांनी जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment