Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, July 23, 2024

भाळवणी येथील माजी अपंग गटसचिव पेन्शन पासून वंचित आंदोलन करणार..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

भाळवणी येथील माजी अपंग गटसचिव पेन्शन पासून वंचित आंदोलन करणार.. 

पंढरपूर( प्रतिनिधी) :- पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील माजी गटसचिव सदाशिव रामचंद्र निराळी हे 57% अपंग असून त्यांना तीन वर्षापासून ईपीएस पेन्शन मिळाली नसल्यामुळे त्यांनी प्राधिकृत अधिकारी सोलापूर जिल्हा देखरेख सहकारी संस्था लिमिटेड सोलापूर  व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था लिमिटेड सोलापूर यांच्याकडे दिनांक 10/07 /2024 रोजी नोटीस पाठवली आहे. सदर पेन्शन सुरू न झाल्यास आंदोलन करणार असल्याची माहिती सदाशिव निराळी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

 याबाबत सविस्तर माहिती अशी की सदाशिव निराळी हे सोलापूर जिल्हा देखरेख सहकारी संघ लिमिटेड यांच्याकडे गट सचिव म्हणून पंढरपूर तालुक्यात दिनांक  5/4/ 2021 पासून नोकरीत होते. त्यांनी 18/ 6/ 2021 रोजी गट सचिव पदाचा राजीनामा दिला होता. तो राजीनामा अवसाक  यांनी 28/ 7 /2021 क्रमांक 3 जावक क्रमांक 34 सोलापूर 221 /221 दिनांक 28/07 / 2021 प्रमाणे मंजूर केलेला होता. त्याप्रमाणे 31/0 7/ 2021 रोजी निराळी हे सेवा मुक्त झाले होते. त्यावेळी निराळी यांनी पेन्शनची  कागदपत्राची संपूर्ण पूर्तता करून सर्व कागदपत्रे  12/9/2022 रोजी कार्यालयात प्रस्ताव दाखल केला होता. त्यावेळी पासून आज पर्यंत पेन्शन सुरू झालेली नाही.

याविषयी अधिक माहिती देताना निराळी म्हणाले की मी पायाने 57% अपंग आहे व अस्थिवंग स्पॉडिलायसिस चा रुग्ण आहे मला बीपी चा आजार आहे तसेच संपूर्ण घरातील कुटुंबाची जबाबदारी आहे. मला इतर कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही. तरीही मी माझी पेन्शन मंजूर व्हावी म्हणून सोलापूर येथील कार्यालयात वारंवार हेलपाटे मारलेले आहेत. त्याचबरोबर माझ्या प्रायव्हेट फंड हे ऑफिसने अपलोड केलेला नाही. प्रत्येक वेळी सर्वर डाऊन असल्याचा प्रॉब्लेम सांगितला जात आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी माझ्या पेन्शन प्रकरणी लक्ष देऊन लवकरात लवकर पेन्शन सुरू करावी. अन्यथा कार्यालया पुढे आंदोलन करणार असल्याचे सदाशिव निराळे यांनी सांगितले आहे.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment