Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, July 19, 2024

विशाल गड" दंगलीची न्यायालयीन चौकशीची रिपाईची मागणी..



सारा न्यूज नेटवर्क - 

विशाल गड"  दंगलीची  न्यायालयीन चौकशीची रिपाईची  मागणी..

सोलापूर (प्रतिनिधी) :- कोल्हापूर येथील विशाल गड या ठिकाणी मस्जिद च्या आसपास अनधिकृत  अतिक्रमण झाले  आहे ते अतिक्रमण हटवले पाहिजे म्हणून कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज यांनी त्यांच्या नेतृत्व खाली विशाल गडावर  जाऊन आंदोलन केले परंतु  त्यांच्या आंदोलन चा काही समजकंटक  लोकांच्या जमावाने  दगड फेक जाळपोळ करून  दंगल घडवून आणली. या भ्याड कृत्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने  तीव्र निषेध करीत असून या दंगलीची न्यायालाईन चौकशी करावी. अशी  मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कडे  निवेदनाच्या मार्फत करण्यात आली.  या दंगली मध्ये नाहक ज्या मुस्लिम समाजाचा काही संबंध नसताना सुद्धा त्यांना लक्ष  करण्यात आले. विशाल गडाच्या पायथ्याशि गजापूर या मुस्लिम वस्ती मध्ये घुसून जमावणे त्यांच्या घराची नासधूस केली. तसेच महिलांना मारहाण केली मौल्यवान वस्तूची  तोडफोड करण्यात आली चारचाकी गाड्या दोन चाकी  गाडयांची नुकसान केले. तेव्हा अशा समाजकंठकास  शासन झाले पाहिजे. नुकसानग्रस्त लोकांना आर्थिक मदत देऊन झालेल्या दंगलीची न्यायालीन चौकशी करावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली. 


या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश अध्यक्ष सुबोध वाघमोडे, रावसाहेब परीक्षाळे, धर्मा माने, रजाक मुजावर सलीम मुल्ला, सिंकदर शेख,  मारुती सोनवणे,  मेजर साबळे, इम्रान शेख, इब्राहिम शेख, समिर मुजावर, कल्लापा बनसोडे, रफिक  शेख,अमिना शेख, नसरीन  शेख, रुपाली कोळी, धनराज  गायकवाड, इरफान कल्याणी आदि प्रमुख पदाधीकारी उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment