सारा न्यूज नेटवर्क -
विजापूर नाका डी बी पथकाची दमदार कारवाई, जबरी चोरी करणाऱ्या आरोपीस केले जेरबंद..
सोलापूर (प्रतिनिधी ) :- विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीत स्पोर्ट्स मोटारसायकल वर फिरून व इतर दुचाकी स्वारांना अडवुन कट मारल्याचा बहाना करून तसेच रस्त्याच्या आडबाजुला थांबुन लघवी करणा-या लोकांना मारहाण करून त्यांच्या खिसातील पैसे साथीदाराच्या मदतीने जबरदस्तीने काढणारा आरोपी मोहम्मद अयान जावीद शेख वय १९ वर्षे, कायम रा.४५२ संजय गांधी नगर झोपडपट्टी, आम्रपाली चौक, विजापूर नाका, सोलापूर सध्या रा. घर नं. ९० मोठी मशिद चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर यास दि. १८/०७/२०२४ रोजी अटक करून विजापूर नाका पोलीस स्टेशन कडील जबरीचा चोरीचा एक गुन्हा उघड केला. तसेच वरील आरोपीने व त्याच्या साथीदारांनी मिळुन अशा प्रकारचे आणखी गुन्हे केले असल्याची शक्यता असुन त्याबाबत तपास चालु आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त एम. राजकुमार पो.उप.आयुक्त (परीमंडळ) विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त वि-२ यशवंत गवारी व पोनि दादा गायकवाड पोनि श्रीमती संगिता पाटील (गुन्हे) व गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सपोनि/ शीतल कुमार गायकवाड, पोहेकॉ/सचिन हार, शंकर भिसे, गणेश शिर्के, पोना/हुसेन शेख, पोकॉ/संतोष माने, अमृत सुरवसे, श्रीनिवास बोल्ली, सद्दाम आबादीराजे, समाधान मारकड, राहुल सुरवसे, स्वप्निल जाधव, रमेश कोर्सेगाव, हरिकृष्ण चोरमुले यांनी ही कारवाई केली.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment