Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Wednesday, October 9, 2024

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

महाराष्ट्र शासनाने देशी गायींना राज्य मातेचा दर्जा दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांचा सन्मान... 

सोलापूर(प्रतिनिधी) :- गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ घोषित करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारकडून घेण्यात आला. याचे प्रस्ताव महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोग यांच्या मार्फत शासनाकडे पाठविले होते. कॅबिनेट बैठक दरम्यान राज्यातील देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ घोषित करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच राज्यातील गोशाळा यांना प्रती दिन प्रती गोवंश ५० रुपयाचे अनुदान, देशी गाय सांभाळण्यासाठी गोवर्धन गोवंश योजना ह्या साठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्न मुळे या निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे मंगळवेढेकर सभागृह सोलापूर येथे त्यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. बसवारूढ महाराज मठाचे श्री श्री शिवपुत्र स्वामीजी, जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प लक्ष्मण महाराज चव्हाण, विश्व हिंदू परिषदेचे अभिमन्यू डोंगरे महाराजयांच्या हस्ते शेखर मुंदडा यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे उपयुक्त बोरकर, विश्व हिंदू परिषदेचे संजय जमादार, गोशाळा महासंघ सोलापूरचे अध्यक्ष महेश भंडारी आणि महा एनजीओ फेडरेशनचे संचालक अमोल उंबरजे हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू राष्ट्र सेना, गोशाळा महासंघ सोलापूर, सामाजिक संस्था व समस्त गोरक्षक दल सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा सन्मान सोहळा आयोजित केला होता. सन्मान सोहळापूर्वी गोमातेची सर्व मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

सन्मानाला उत्तर देताना शेखर मुंदडा म्हणाले कि, देशी गायीचं दूध पौष्टीक असतं. मानवी पोषणासाठी देशी गायीचं दूध अत्यंत महत्त्वाचं असतं. मानवी आहारातील दूधाचं महत्त्व, आयुर्वेद चिकित्सेतील पंचगव्याचं महत्त्व, जैविक शेतीसाठी शेण आणि गोमूत्राचं महत्त्व पाहता गायीला राज्यमाता घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वरिष्ठ अधिकारी यांनी खूप मदत केली. सर्व गोरक्षक एकजूट होऊन अजून जोमाने काम करूयात असे आव्हान करत महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे आत्तापर्यंत व पुढील दिशा काय असेल हे स्पष्ट केले.

यावेळी सवारूढ महाराज मठाचे श्री श्री शिवपुत्र स्वामीजी यांनी शेखर मुंदडा यांच्या कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले. जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प लक्ष्मण महाराज चव्हाण यांनी देशी गाईचे महत्व सांगितले.

सोलापूर शहर व जिल्ह्यातील गोभक्त व गोशाळा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सन्मान सोहळ्याचे आयोजन विश्व हिंदू परिषदेचे संजय जमादार, गोशाळा महासंघ सोलापूरचे अध्यक्ष महेश भंडारी आणि महा एनजीओ फेडरेशनचे संचालक अमोल उंबरजे यांनी केले होते. आयोजक महेश भंडारी यांनी गोसेवा आयोग व शेखर मुंदडा यांच्या कार्यकाळात खूप चांगले आणि लवकर निर्णय झाल्याबद्दल संपूर्ण गोसेवक आनंदी असल्याचे नमूद केले.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment