सारा न्यूज नेटवर्क -
श्री रूपाभवानी देवीची पालखी मिरवणूक उत्साहात;
सीमोलंघनाचा कार्यक्रम भक्तीभावाने साजरा..
सोलापूर (प्रतिनिधी) :- दि . १२- येथील रूपाभवानी मातेची पालखी मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. मिरवणुकीने सिमोलंघन करून नवरात्रोत्सवाची भक्तीभावाने सांगता करण्यात आली.
शनिवारी, विजयादशमीनिमित्त पहाटे काकड आरती, महानवमीनिमित्त देवीस अलंकार महापूजा करण्यात आली. यावेळी काशी जगद्गुरु श्री श्री श्री १००८ श्री मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी, माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, नागणसूरचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात हा कार्यक्रम संपन्न झाला. त्यांनी देवीचे मनोभावे दर्शन घेऊन सोलापूरकरांच्या सुख-समृद्धीसाठी देवीला साकडे घातले. याप्रसंगी ट्रस्टी, वहिवाटदार व पुजारी मल्लिनाथ मसरे, सुनील मसरे, अनिल मसरे, मनीष मसरे, सारंग मसरे, प्रतीक मसरे आदी उपस्थित होते.
सायंकाळी श्रीदेवीची सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात येऊन सार्वजनिक सीमोलंघन करण्यात आले. शमी पूजनासाठी ही पालखी मंदिरातून तुळजापूर वेस मार्गे, मधला मारुती, माणिक चौक, विजापूर वेस, पंचकट्टा श्री सिद्धेश्वर मंदिर, पार्क चौक येथून हुतात्मा पुतळाशेजारील पुतळ्याजवळील शमी वृक्षाजवळ वाजत -गाजत आणण्यात आली.
यावेळी शमी वृक्षाची पारंपरिक पद्धतीने पूजा करून पाच प्रदक्षिणा घालण्यात आल्या. आई राजा उदो...उदोच्या गजरात प्रदक्षिणा घालून पालखी पूजन करण्यात आली. त्यानंतर सोने वाटून एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देत पालखी पार्क चौक, श्री सिद्धेश्वर मंदिर, लक्ष्मी मार्केट, दत्त चौकमार्गे पुढे मसरे गल्ली येथील अंबिका देवीची आरती करण्यात येते. त्यानंतर गवंडी गल्ली येथील कसबा देवीची महापूजा मस्तरे परिवाराच्या वतीने करण्यात आली. त्यांनतर पालखी पुन्हा रुपा भवानी मंदिरात नेण्यात आली.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment