Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, October 22, 2024

SARA NEWS NETWORK



सारा न्यूज नेटवर्क - 

 विश्व परिवर्तन फॉंऊडेशन संचलित पत्रकार संरक्षण समिती व लेटेस्ट न्यूज नेटवर्क च्या कार्यालयास AIMIMचे फारुख शाब्दी यांची धावती भेट....!

सोलापूर (प्रतिनिधी) :- विश्व परिवर्तन फॉंऊडेशन संचलित पत्रकार संरक्षण समितीच्या संपर्क कार्यालयास ए.आय.एम.आय.एम.पक्षाचे विधानसभा शहर मध्य मतदार संघाचे उमेदवार फारुख शाब्दी  यांनी अचानक भेट दिली  पत्रकार संरक्षण समिती च्या वतीने विश्व परिवर्तन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अश्फाक शेख सर यांच्या हस्ते पुष्पहार व शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला  वेळी फारुख शाब्दी यानी पत्रकारांना मार्गदर्शन व आभार मानत आपले मनोगत व्यक्त करताना  म्हणाले की,पत्रकार हा दिवस रात्र काम करत असतात.पत्रकारांना वेळेचे बंधन नसते.ते जनतेच्या समोर सत्य आणण्याचे काम पत्रकार करीत असतात.मी निवडून आलो तर पत्रकरांना स्पेशल प्रोटेक्शन देण्यासाठी हा कायदा अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करेन असे आश्वासन शाब्दी यांनी दिले.यावेळी पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने विश्व परिवर्तन फॉंऊडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशपाक शेख सर,महामूद पठाण,पत्रकार संरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष युनूस अत्तार,शहराध्यक्ष विजयकुमार उघडे,विश्व परिवर्तन फॉंऊडेशनचे प्रदेशाध्यक्ष रफिक बागवान, राष्ट्रिय उपाध्यक्ष इक्बाल शेख,राष्ट्रीय सदस्य बुऱ्हाण काझी,वशिष्ठ सोनकांबळे,आर.डी.जाधव, युसुफ पिरजादे,सुहास जोशी,जुनेद चंदा आदी पत्रकार,पदाधिकारी ,सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.ए.आय.एम.आय.एम.पक्षाचे कार्यकर्ते ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.पत्रकार संरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष युनूस अत्तार यांनी ओळख करून दिली.तर फारुख शाब्दी यांच्या सदिच्छ भेट दिल्याबद्दल पत्रकार संरक्षण समितीचे शहर अध्यक्ष विजयकुमार उघडे यांनी आभार मानले.आर.डी.जाधव यांनी प्रस्तावना केली.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment